अकोल्यात संचारबंदीच्या काळात दारूची विक्री; दोघे अटकेत ....

 जयेश गावंडे
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  देशी-विदेशी दारूची दुकाने, बीयर बार आणि मद्यालये बंद आहेत. त्यामुळे मद्यपींची चांगलीच अडचण होते आहे

अकोला : कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात संचारबंदी Curfew लागू करण्यात आली आहे.  देशी-विदेशी दारूची दुकाने, बीयर बार आणि मद्यालये बंद आहेत. त्यामुळे मद्यपींची चांगलीच अडचण होते आहे. हीच बाब हेरून अनेकांनी दारूतस्करीकडे मोर्चा वळविला आहे. Two arrested for Sale of liquor during curfew in Akola 

दुसरीकडे कोरोनामुळे गावागावात सतर्कता असल्याने शेतशिवारातं तर नदीकाठी दारूचे अड्डे बनविले जात आहेत. यामुळे पोलीस Police प्रशासनाची डोकेदुखी चांगलीचं वाढली आहे. दरम्यानं, कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे.

याचाच फायदा गल्ली बोळीत अवैध दारू विक्रेते घेत आहेत. दरम्यान, अशाच प्रकारे दारुची तस्करी केली जात आहे. अशी माहिती खदान पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलीसांनी आज रात्रीच्या सुमारास कारवाई करीत दोन लोकांना ताब्यात घेतले आहे. आकाश सिंग गृरूपालसिंग टाक आणि सिद्धार्थ मधुकर प्रधान असं दोघांची नावे असून दोघेही खदान परिसरातील रहिवासी आहेत. Two arrested for Sale of liquor during curfew in Akola 

त्यांच्याकडून पोलिसांनी देशी दारुसह मोबाईल Mobile आणि एकत्रित १ लाख ५० हजारांच्या जवळपास मुद्देमाल जप्त केला आहे.  दरम्यान, संचार बंदीचे उल्लंघन करून अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे दारूची विक्री व तस्करी केली जात आहे, हे पोलीसांच्या कारवाईनंतर समोर आले आहे. 

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live