दुर्मिळ जातीच्या मांडुळ सापांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

रोहिदास गाडगे
मंगळवार, 18 मे 2021

पुणे नगर महामार्गावरील शिक्रापुर येथे 25 लाख रुपये किमतीच्या दुर्मिळ जातीच्या मांडुळाच्या सापाची तस्करी करुन विक्रीसाठी जात असलेल्या दोन तरुणांना सापळा रचुन शिक्रापुर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडुन दुर्मिळ जातीचा मांडुळ साप जप्त करत दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद साळुंखे ,सागर जाधव अशी अटक केलेल्या दोन मांडुळ तस्करांची नावे आहे. 

पुणे - पुणे Pune नगर महामार्गावरील शिक्रापुर Shikrapur येथे 25 लाख रुपये किमतीच्या दुर्मिळ जातीच्या मांडुळाच्या सापाची Snake तस्करी smuggling करुन विक्रीसाठी जात असलेल्या दोन तरुणांना सापळा रचुन शिक्रापुर पोलीसांनी अटक Arrest केली आहे. त्यांच्याकडुन दुर्मिळ जातीचा मांडुळ साप जप्त Confiscated करत दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद साळुंखे ,सागर जाधव अशी अटक केलेल्या दोन मांडुळ तस्करांची नावे आहे. Two arrested for smuggling Mandal snakes

पुणे नगर महामार्गावरुन शिक्रापुरच्या दिशेने प्रमोद व सागर हे दोघे तरुण दुचाकीवरुन जात असताना दोघांकडुन काळ्या रंगाचा दुर्मिळ जातीचा मांडुळ जातीचा साप असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती या काळ्या मांडुळाची दुर्मिळ जात असल्याने त्याला मोठ्या किमतीत विक्री केली जाते.

हे देखील पहा -

यावरून शिक्रापूर पोलिसांनी सापळा रचुन वाडा गावठाण हद्दीतील कल्याणी फोर्ज कंपनीच्या मागील बाजुस २ आरोपींना मांडुळ सापांसह  ताब्यात घेतले. या दोघांना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले. Two arrested for smuggling Mandal snakes

मावळ मधील एका युवकाने केली स्वखर्चातून सॅनिटायझर फवारणी

दुर्मिळ जातीच्या मांडुळ सापांची विक्री करण्याऱ्या अनेक टोळ्या उत्तर पुणे जिल्ह्यात सक्रिय आहे. त्यानुसार या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे ग्रामीण दलाची तयारी सुरु आहे. या दुर्मिळ जातीच्या मांडुळाला लाखो रुपयांमध्ये विक्री होत असल्याने तस्करी वाढली आहे.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live