अरे देवा! सिरसी येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू शेतकऱ्याचे मोठे नुकसान...

bhandara rain
bhandara rain

भंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्यातील सिरसी Sirsi येथील रहिवासी फुलचंद साठवणे यांच्या घरामागे झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांच्या Bullocks अंगावर वीज Lightning पडल्याने Strike दुर्दैवी मृत्यू Death झाल्याची घटना घडली आहे. ऐन शेतीच्या हंगामात बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचे Farmer मोठे नुकसान Damage  झाले आहे. Two Bullocks Killed In Lightning Strike At Sirsi

हवामान IMD खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात काल विजांच्या गडगडाटासह पावसाचे Rain आगमन झाले होते. त्यावेळी शेतकरी फुलचंद  साठवणे यांनी शेतावरील काम आटपून बैलांना घरामागे असलेल्या झाडाखाली चारा टाकुन बांधून ठेवले होते.

हे देखील पहा -

दुपारी अचानकपणे विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान वीज पडून जोरदार आवाज झाला, तेव्हा फूलचंद यांनी घरामागे जाऊन बघितले असता, त्यांच्या घरामागे बांधले असलेल्या दोन बैलांचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. Two Bullocks Killed In Lightning Strike At Sirsi

मृत पडलेल्या बैलांकडे बघून शेतकऱ्याला अश्रूंचा पाझर फुटला. पोटच्या लेकरा प्रमाणे जपलेल्या बैलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नुकताच शेतीचा हंगाम सुरू झाला असून मान्सून पूर्व शेतीचे कामे करण्यासाठी  बैल कुठून आणणार असा प्रश्न शेतकऱ्यापुढें पडला आहे. त्यामुळे शासनाने Government आर्थिक Financial मदत Help करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.  

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com