बुलडाण्यातील बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या! बालसुधारगृह का बनलेत मृत्यूचे सापळे?

साम टीव्ही
रविवार, 6 डिसेंबर 2020
  • बालसुधारगृह का बनलेत मृत्यूचे सापळे?
  • महाराष्ट्रातले बालसुधारगृह किती सुरक्षित?
  • बुलडाण्यात बालसुधारगृहात दोघांची आत्महत्या

महाराष्ट्रातली बालसुधारगृह सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडावा अशा घटना वारंवार घडू लागल्यायत. बुलडाण्यातील बालसुधारगृहात दोन आरोपींनी केलेल्या आत्महत्या हेच अधोरेखित करतायत.

ही दृश्य आहेत बुलडाण्याच्या शासकीय बालसुधारगृहातील... शासकीय बालसुधारगृहात 2 अल्पयीन आरोपींनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. 10 दिवसांआधीच दोघांची रवानगी या सुधारगृहात करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे, यातला एक आरोपी एकदा पळूनही गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला कडून बालसुधारगृहात डांबलं होतं.
 
बालसुधारगृहात हत्या, आत्महत्यांचे प्रकार वाढलेले आहेतच, त्यातच बुलडाण्यात घडलेल्या घटनेमुळे बालसुधारगृहांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे, बालसुधारगृहांबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवीच. पण, त्याचसोबत लहान मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत म्हणूनही शासकीय, सामाजिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live