इंदापूरच्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांसह दोन परिचारिकांना मारहाण

Beating
Beating

बारामती : तुम्ही आमच्या वडिलांवर व्यवस्थित औषधोपचार करीत नाही असे म्हणून कोविड सेंटरमध्ये Covid Center घुसून कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर Doctor व दोन परिचारिका महिलांना मारहाण झाल्याची घटना पुणे Pune जिल्ह्यातील इंदापूर Indapur येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये शनिवारी घडली आहे. Two nurses along with doctor beaten at Indapur Sub-District Hospital Covid Center

या घटनेमधील मारहाण करणाऱ्या दोन जणांवर इंदापूर पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.सदर प्रकारामुळे कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्यदुतांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुनील चंद्रकांत रणखांबे व रवी चंद्रकांत रणखांबे, राहणार पंचायत समिती कॉलनी रुम नंबर ४ इंदापूर आहि डॉक्टर आणि परिचारकांस मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर श्वेता संभाजी कोडग या उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर सेवा करीत असतात. रुग्णालयातील Hospital वार्ड क्रमांक तीन मध्ये नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत असताना, रुग्ण चंद्रकांत चन्नाप्पा रणखांबे यांचे नातेवाईक सुनील व रवी रणखांबे यांनी कोविडच्या वार्ड ३ मध्ये जबरदस्ती प्रवेश करून तुम्ही माझ्या वडिलांवर व्यवस्थित औषध उपचार करीत नाहीत म्हणून डॉक्टर कोडग यांचा हात पिरगाळुन डाव्या गालावर चापट मारली.Two nurses along with doctor beaten at Indapur Sub-District Hospital Covid Center

तसेच परिचारिका अंजली बिभीषण पवार, राहणार इंदापूर व सोमय्या सत्तार बागवान (राहणार अकलूज ता, माळशिरस ) यांना देखील हाताने मारहाण केली. या मारहाणीत आरोग्यसेविका अंजली पवार यांना गळ्याला जखम झाली आहे. 

त्यामुळे अहोरात्र कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा व आरोग्य सेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे मत इंदापूर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर एकनाथ चंदनशिवे यांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com