८० हजाराला चार रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना अटक

विकास मिरगणे
मंगळवार, 27 एप्रिल 2021

नवी मुंबईत जवळ असलेल्या कोपरखैरणे रेमिडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु होता. कोरोना काळात आवश्यक असलेले रेमिडेसीवीर इंजेक्शन ब्लॅकने विकणाऱ्या दोन आरोपींना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे.

कोपरखैरणे: कोरोना Corona झालेल्या काही रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन Remedicivir injections उपयुक्त ठरत आहे. सरकार हे इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत आहे. परंतु त्याची संख्या अपुरीच पडत आहे. एक कारण म्हणजे काही ठिकाणी त्याचा काळा बाजार Black market सुरु आहे. असेच नवी मुंबई जवळ असलेल्या कोपरखैरणेत Koparkhairane रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु होता. कोरोना काळात आवश्यक असलेले रेमिडेसीवीर इंजेक्शन ब्लॅकने विकणाऱ्या दोन आरोपींना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. Two peoples arrested for selling remedicivir injections in black

रेमिडेसीवीर इंजेक्शन ब्लॅक ने विकण्याचा धंदा सुरु असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे आरोपींना रंगे हाथ पकडण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले आणि आपण ब्लॅक मध्ये इंजेक्शन घेण्यास तयार आहोत असे सांगत इंजेक्शन विकणारऱ्या समीर चांदोरकर याला कोपरखैरणे पोलिसांनी संपर्क साधला. 

८० हजार रूपयांना चार इंजेक्शन आपण घेण्यास तयार असल्याचे आरोपीस पटवून विश्वासात घेतले. आरोपी समीर चांदोरकर याला कोपरखैरणे सेक्टर १५ येथे पोलिसांमार्फत ग्राहकाच्या नावाखाली बोलविण्यात आले होते. यावेळी सापळा रचून पोलिसांनी आरोपीकडे असलेले चार रेमिडेसीवीर इंजेक्शन ताब्यात घेतले. आणि आरोपी समीर चांदोरकर याला अटक केली.  Two peoples arrested for selling remedicivir injections in black

रेमिडेसीवीर इंजेक्शन त्याच्याकडे आले कुठून याची पोलीसांनी विचारपूस केली. पोलिसांच्या प्रश्नाचे उत्तर देत आरोपीने सांगिलते की, खाजगी रूग्णालयात Private Hospital काम करणाऱ्या मित्राच्या मदतीने आपण रेमिडेसीवीर इंजेक्शन मिळवले आहे. त्यानंतर आरपीच्या मित्राला देखील अटक करण्यात आलेली आहे. तसेच हे राहणारे कल्याणचे Kalyan आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे रेमिडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून रुग्णालयातील कर्मचारीच आहेत असे चित्र दिसून येते. 

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live