एकविरा देवी मंदिर परिसरात ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने अपघात दोन जण जखमी

भूषण अहिरे
शनिवार, 29 मे 2021

एकवीरा देवी मंदिर परिसरात असलेल्या पूला जवळ एका ट्रॅक्टरचे टायर tractor tire फुटूल्याने भीषण अपघात झाला.  या अपघातामध्ये एक लहान बालकासह पुरुष जखमी झाला आहे.

धुळे - एकवीरा देवी मंदिर परिसरात असलेल्या पूला जवळ एका ट्रॅक्टरचे टायर tractor tire फुटूल्याने भीषण अपघात झाला.  या अपघातामध्ये एक लहान बालकासह पुरुष जखमी झाला आहे. जखमींना तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे . (Two persons were injured in a tractor tire rupture near Ekvira Devi temple)

अशी माहिती परिसरातील एका प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ सुरू असते. परंतु दुर्घटनेच्या समयी रस्त्यावर जास्त गर्दी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

शिक्षण देण्यासाठी शिक्षकाने घराच्या छतावर तयार केली आगळीवेगळी शाळा

प्रभात नगरकडून सावरकर पुतळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरचे टायर फुटूल्याने चालकाचा ताबा सुटला.  त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना ट्रॅक्टर चालकाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली .

त्यामुळे  परिसरात असलेल्या एका दुकानाच्या बाजूला जाऊन आदळला या अपघातामध्ये बाईकस्वार व एक लहान मुलगा जखमी झाला आहे.  जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने एका खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Edited By - Puja Bonkile 

हे देखिल पहा - 


संबंधित बातम्या

Saam TV Live