किल्ले हडसरवर संवर्धनात सापडल्या सात फुटी लांबीच्या दोन तोफा.

मंगेश गाडे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

जुन्नर तालुक्यातील किल्ले हडसर वर संवर्धनाचे काम करणाऱ्या तरुणांना कमानी टाक्यातला गाळ काढताना दोन तोफा आढळून आल्या आहेत

जुन्नर : जुन्नर Junnar तालुक्यातील किल्ले हडसर Hadsar वर संवर्धनाचे काम करणाऱ्या तरुणांना कमानी टाक्यातला गाळ काढताना दोन तोफा आढळून आल्या आहेत. यातुन या तोफा Cannon सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. यामुळे इतिहास प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरले आहे. यामुळे किल्ले हडसरचा इतिहास आणखी उलगडण्यात मदत होणार आहे. Two seven-foot-long cannons found in conservation at Fort Hudsar

तीन वर्षांपासून किल्ले हडसर वर संवर्धनाचं काम शिवाजी ट्रेलच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यात गडाचा मुख्य दरवाजा, दुसरा दरवाजा पायरी मार्ग, धान्य कोठार तसंच माहिती फलक, दिशा दर्शक फलक, नव्याने तयार करण्यात आलेला गडाचा पूर्ण नकाशा, ही कामे आतापर्यंत करण्यात आली.  यात गडावरील मुख्य पाण्याचे स्रोत असणाऱ्या कमानी टाके हे संपूर्ण गाळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या टाक्यातील गाळ काढत असताना दोन तोफा कमानी टाक्यामध्ये आढळून आल्या त्या सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्या.

त्यातील एक तोफ सात फूट लांबीची आणि बॅरलचा चार इंच व्यास असून दुसरी तोफ सात फुट चार इंच लांब  बॅरलचा व्यास दोन इंच आहे. त्यावर सुंदर मकरमुख ही आहे. मरहट्टे सह्याद्रीचे संवर्धन ग्रुप यांच्या मार्फत या तोफांना लवकरच तोफगाडे बसवून त्यांना संरक्षित करण्यात येईल. असे शिवाजी ट्रेलचे विनायक खोत ,मेजर रमेश खरमाळे यांनी सांगितले.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live