उदयनराजे भाजपवर नाराज?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पुणेः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच नाशिकमध्ये आले होते. व्यासपीठावर उदयन राजे हे एका बाजुला उभे राहिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उदयन राजे यांना भाजपने त्यांची जागा दाखवली आहे. असे म्हणत राजेंचा भाजपने अपमान केल्याचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. उदयन राजे भोसले हे आपल्या हटके स्टाईल आणि बेधडकपणासाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीत असताना त्यांनी अनेकवेळा पक्षनेतृत्वावरच जाहीररीत्या तोफ डागली होती. तसेच अनेकवेळा पक्षशिस्तीचा भंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप झालेला आहे. भाजपच्या मेळाव्याला गैरहजर राहून उदयनराजेंनी भाजपला पहिलं सरप्राईज दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभेसोबत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. लोकसभेची पोटनिवडणूक लांबणीवर पडल्याने उदयनराजे भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत गेलेले साताराचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला कणखरपणा दाखवला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्याला उदयन राजे गैरहजर राहिले आहे. नड्डा यांच्या उपस्थितीत या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील, रणजित मोहिते पाटील आणि धनंजय महाडीक हजर असताना उदयनराजेंनी मात्र दांडी मारली.

Web Tittle : Udayan Raje angry at BJP?


  


संबंधित बातम्या

Saam TV Live