VIDEO | दिल्लीत जाणाऱ्या उदयनराजेंना गल्लीत चेकमेट करण्याची खेळी ?

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

उदयनराजे भोसलेंची राज्यसभेवर वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालंय. पण दिल्लीत जाणाऱ्या उदयनराजेंना गल्लीत चेकमेट करण्याची जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरु केलीय. शशिकांत शिंदेचा चेहरा पुढे करुन साताऱ्यात राजेंना शह देण्याची खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जातेय. सध्या राजेंची बालेकिल्ल्यात झालेली ढिली पकड ही राष्ट्रवादीसाठी नामी संधी आहे. शिंदेंना मंत्रिपद देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत राजेंची कोंडी करता येऊ शकते, अशी रणनीती आखली जातेय.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा तालुक्याचा काही भाग येतो. मागच्या निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसलेंनी शिंदेंच्या विरोधात रान उठवलं होतं. त्यातून शिंदेंना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. पराभवाचा वचपा काढण्याची संधी शिंदे शोधतायंत. त्यामुळेच राजेंना शह देण्यासाठी शिंदेसारख्या सरदाराला बळ देण्याची रणनीती आखण्यात आलीय.

WebTittle :: Udayan Rajen going to Delhi to checkmate in the street?

संबंधित बातम्या

Saam TV Live