वाढदिवशी उदयनराजेंना मिळणार हे birthday gift

सरकारनामा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

सातारा लोकसभा निवडणुकीतील पराभवाची भरपाई करताना उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रीपद देण्याचा शब्द खुद्द केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

सातारा : साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस येत्या 24 फेब्रुवारीला आहे. या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून भाजपकडून त्यांना राज्यसभेवर घेण्याची आणि मंत्रीपद देण्याची घोषणा होणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीतील पराभवाची भरपाई करताना उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रीपद देण्याचा शब्द खुद्द केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिला आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यासाठी 3 एप्रिलला राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार असून यातील एक जागेवर  उदयनराजे भोसले यांची खासदार म्हणून वर्णी लावण्यात येणार आहे.

त्यासाठी 3 एप्रिलची वाट न पाहता उदयनराजे भोसले यांच्या 24 फेब्रुवारी या वाढदिवसाच्य दिवशी गिफ्ट म्हणून भाजपकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही झाले आहेत. तसेच उदयनराजे यांच्या समर्थकात ही याबाबत चर्चा सुरू आहे. आता वाढदिनी उदयनराजे भोसले यांना भाजपकडून कोणते गिफ्ट मिळणार याची सातारकरांना उत्सुकता लागली आहे. उदयनराजेंच्या वाढदिवसा दिवशी भाजपकडून काहीतरी घोषणा होऊन त्यांचा उचित सन्मान होईल याची प्रतीक्षा आहे.
 

WebTittle ::   udaynraje will get gift from bjp


संबंधित बातम्या

Saam TV Live