उद्धव ठाकरेंची लवकरच आमदार म्हणून निवड होणार - सूत्र

साम टीव्ही
गुरुवार, 30 एप्रिल 2020
  • उद्धव ठाकरेंची लवकरच आमदार म्हणून निवड-सूत्र
  • राज्यपाल नियुक्त आमदाराचा पेच सुटणार?
  • राज्यपाल ठाकरेंच्या नावाला मान्यता देणार- सूत्र
  • मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीचा वाद मिटणार?

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन राज्यात उभा राहिलेला पेच लवकरच सुटणार आहे. कारण, विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी राज्यपाल उद्धव ठाकरेंच्या नावाला मान्यता देण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळतेय. 

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन बातचीत केलीय..यामध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलं नाही. मात्र, कुठलाही घटनात्मक पेच या परिस्थितीत तयार करायचा नाही असं वरिष्ठ पातळीवरुन सांगण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळं कालपर्यंत धास्तीत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना थोडा दिलासा मिळालाय. अजित पवारांसह मंत्रिमंडळानं काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे उद्धव ठाकरेंच्या नावाचा नवा प्रस्ताव दिला होता.

उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला होता. त्यात नक्की काय बोलणे झाले, हे समजू शकले नाही. मात्र काल संध्याकाळपासून महाआघाडीच्या नेत्यांमध्ये उद्धव हे आमदार होणार नाहीत, अशी धास्ती होती. ती आता दूर झाल्याचे समजते. राज्यात घटनात्मक पेचप्रसंग येणार नसल्याची ग्वाही राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्यानेही दिली. 

Web Title - Uddhav Thackeray to be elected MLA soon -


 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live