उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची लाज राखली: विनोद तावडे

सरकारनामा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

मुंबई: 'एल्गार परिषदेच्या तपासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही दबावाला बळी पडले नाहीत. महाराष्ट्राची लाज राखणारा निर्णय त्यांनी घेतला', अशा शब्दांत भाजप नेते विनोद तावडे यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

मुंबई: 'एल्गार परिषदेच्या तपासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही दबावाला बळी पडले नाहीत. महाराष्ट्राची लाज राखणारा निर्णय त्यांनी घेतला', अशा शब्दांत भाजप नेते विनोद तावडे यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंधित एल्गार परिषदेच्या तपासाबाबत राज्य शासन एसआयटी स्थापन करण्याच्या विचारात असताना हे प्रकरण केंद्र शासनाने 'एनआयए'कडे दिले. या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पवारांच्या भुमिकेला अनुसरून विधाने केली होती. त्यामुळे या तपासाच्यासंदर्भाने राज्य- केंद्र संघर्ष होईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यापार्श्वभुमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तपास 'एनआयए'कडे देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भाजपच्या सोयीचा असल्याने आज भाजपने उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. 

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले, कोरेगाव प्रकरणाबाबत उद्धव ठाकरे यांनी अत्यंत योग्य भूमिका घेतली. महाराष्ट्राचा लाज राखणारा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे कोणाच्याही दबावाला बळी पडले नाहीत. शरद पवार यांना काही तरी वाटतंय म्हणून निर्णय बदलायचा, असं होत नाही.
 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live