उदयनराजेंच्या अपमानाचा करण्याचा कोणताही हेतू नाही : उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

मुंबई : राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. उदयनराजेंकडून आम्हाला ज्या अपेक्षा आहेत, त्या आम्ही "सामना'तून व्यक्त केल्या आहेत. त्यांचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नाही, असेही सांगत ठाकरे यांनी या वादावर पडदा टाकला.

मुंबई : राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. उदयनराजेंकडून आम्हाला ज्या अपेक्षा आहेत, त्या आम्ही "सामना'तून व्यक्त केल्या आहेत. त्यांचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नाही, असेही सांगत ठाकरे यांनी या वादावर पडदा टाकला.

अयोध्येत राम मंदिराची पहिली वीट शिवसेनाच रचेल, असे वक्तव्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले. राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना आग्रही राहिली आहे. सरकारने काश्‍मीरप्रश्‍नी तातडीने निर्णय घेतला; त्याप्रमाणे राम मंदिराचा धाडसी निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. पाकिस्तानला आधी उत्तर दिले आहे, आता पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या भाषेत उतर द्यायला हवे. ती वेळ आता आली आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. युतीचे आम्ही बघू, असे सांगत त्यांनी जागावाटपाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले. 

मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याचा मुद्दा तापला असून नाणार प्रकल्पाचे जे झाले तेच "आरे'संदर्भात होईल, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीत तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

आरे जंगलातील कारशेडवरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने उभे ठाकल्याचे सध्याचे चित्र आहे. नाणार प्रकल्पाचे झाले तेच "आरे'चे होणार, असे सांगत उद्धव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध दर्शवला. मेट्रो कारशेडसाठी आरेतील सुमारे दोन हजार 700 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. उद्धव यांनीही आरेतील वृक्षतोडीला विरोध करताना नाणार प्रकल्पाची आठवण करून दिली. लोकांच्या विरोधामुळे सरकारला नाणारचा प्रकल्प रद्द करावा लागला होता. 

Web Title: Uddhav Thackeray statement on Udyanraje Bhosale enters in BJP


संबंधित बातम्या

Saam TV Live