अखेर उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा...

साम टीव्ही
शुक्रवार, 1 मे 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिलाय. 27मे च्या आधी उद्धव ठाकरे हे विधानरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिलाय. 27मे च्या आधी उद्धव ठाकरे हे विधानरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. 
एकीकडे राज्यावर कोरोनाचं संकट असतानाच राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती होती. त्यातच आता निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा दिलाय. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २१ दिवसांनी विधानपरिषद निवडणूक पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली
दरम्यान आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली होती. ३ तासांपूर्वी झालेल्या या भेटीचं कारण महाराष्ट्र दिन असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या तीन तासांच्या नंतर आलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा दिलाय. 
महाआघाडीच्या नेत्यांनी दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते.  राज्यपाल निर्णय घेत नसल्याने अखेर विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लांबणीवर टाकण्यात आलेली निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, असे पत्र महाआघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होते. या पत्राची प्रत निवडणूक आयोग आणि राज्यपालांना देण्यात आली होती. राज्यपालांनीही निवडणुक घेण्याबाबत शिफारस केली होती. अखेर आता यावर निर्णय आला असून, लवकरच विधानपरिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली जाणारे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live