शिवसेना आमदारांसमोर उध्दव ठाकरे राजकीय नाट्याचा रहस्यभेद करणार !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटण्याचं नाव घेत नाही. शिवसेना-भाजपमधील हा गुंता अधिक वाढला आहे.शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली आहे तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यातच भाजप ने आपल्या बैठकीत पुढील पाच वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल असा निर्णय घेतल्याने खवळलेल्या शिवसेनेने आपली अंतिम भूमिका ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई  : राज्यात गेल्या 15 दिवसांपासून रंगलेल्या राजकीय नाट्याचा शेवट करण्याची वेळ आता जवळ आली आहे. मुख्यमंत्रीपदावर अडून बसलेल्या शिवसेनेने पुढील भूमिका ठरवण्यासाठी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे स्वतः  मार्गदर्शन करणार असून सर्व नवनिर्वाचित आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटण्याचं नाव घेत नाही. शिवसेना-भाजपमधील हा गुंता अधिक वाढला आहे.शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली आहे तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यातच भाजप ने आपल्या बैठकीत पुढील पाच वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल असा निर्णय घेतल्याने खवळलेल्या शिवसेनेने आपली अंतिम भूमिका ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना खोटं ठरवणं शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागलं आहे. स्वतः  उद्धव ठाकरे ही मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. त्यामुळे आता माघार न घेता भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. मात्र मोठा निर्णय घेण्याआधी उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना विश्वासात घेऊन त्यांची मतं जाणून घेणार आहेत.आमदारांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील.

गेल्या पाच वर्षात राज्यात महायुतीचे सरकार होतं.या सरकारमध्ये भाजपने शिवसेनेला दुय्यम दर्जाची मंत्रीपदं देऊ केली होती. यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज होतेच शिवाय भाजपच्या मंत्र्यांच्या अडेल भूमिकेमुळे  शिवसेनेच्या नेत्यांच्या आवश्यक निधी न मिळाल्याने विकासकाम करता आली नाहीत. त्यामुळे यावेळी  भाजपच्या जाळ्यात अडकण्यास शिवसेेना नेते तयार नाहीत. उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेणार असून या बैठकीत शिवसेनेचा स्वाभिमान अबाधित राहील असा कठोर निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याचे शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

WebTittle:: Uddhav Thackeray will disrupt political drama in front of Shiv Sena MLAs!

संबंधित बातम्या

Saam TV Live