उजनीच्या दर्जेदार बासुंदीला ‘जीआय’ची प्रतीक्षा

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

गावरान दुधापासून  बनवलेल्या दर्जेदार बासुंदीची गोडी अख्या महाराष्ट्रातच नाही तर राजधानी दिल्लीसह Delhi विदेशातील लंडनपर्यंत  पोचली आहे. अशा या दर्जेदार व चविष्ट सुप्रसिद्ध बासुंदीची कृषी विभागाकडून गोलिक (जीआय) मानांकनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करावी, अशी मागणी आता येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

उजनी  : येथील गावरान दुधापासून Milk बनवलेल्या दर्जेदार बासुंदीची Basundi गोडी अख्या महाराष्ट्रातच Maharashtra नाही तर राजधानी दिल्लीसह Delhi विदेशातील लंडनपर्यंत Landon पोचली आहे. अशा या दर्जेदार व चविष्ट सुप्रसिद्ध बासुंदीची कृषी विभागाकडून Agriculture Department भौगोलिक (जीआय) मानांकनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करावी, अशी मागणी आता येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. Ujani's basundi awaits for GI

सोलापूर-लातूर Latur राष्ट्रीय महामार्गवरील उजनी या गावाला बासुंदीचे गाव म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते. येथे ७० ते ८० वर्षांपासून गावरान दुधापासून बनवला जाणारा असा खूप जुना बासुंदी व्यवसाय आहे. दोन ते तीन व्यवसायिकांनी सुरू केलेला हा व्यवसाय आज ३० ते ३५ व्यावसायिकांकडून चालवला जातो. गावचे पूर्ण अर्थकारण अवलंबून असलेल्या या गोड पदार्थामुळे गावात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक वाहन शासकीय असो किंवा खासगी, आवर्जुन येथील बासुंदीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या महाफुड फेस्टिवलमध्ये मराठवाड्यातून एकमेव उजनीच्या बासुंदीचा समावेश होता. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी बासुंदीचा आस्वाद घेत विशेष कौतुक केले होते. बासुंदीच्या चवीची लोकप्रियता महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता राजधानी दिल्ली तसेच विदेशातील लंडनपर्यंत पोचली. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून बासुंदीची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात. त्यामुळे या ग्रामीण भागातील पदार्थाला जागतिक ओळख आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जीआय  मानांकन मिळणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत उजनीच्या या सुप्रसिद्ध बासुंदीची शिफारस जीआय मानांकनासाठी करावी अशी ग्रामस्थांमधून मागणी केली जात आहेत.Ujani's basundi awaits for GI

उजनीतील सुप्रसिद्ध बासुंदीच्या भौगोलिक मानांकनाची मागणी होत आहे. हे मानांकन मिळाल्यास या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामुळे या भागातील ऐतिहासिक आणि इतर पर्यटन उद्योगाची या व्यवसायाशी सांगड घालण्यास मदत होईल आणि रोजगार निर्मितीत आणखी भर पडेल. मानांकन मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
- डॉ. जगदीश पाटील, उजनीचे सुपुत्र तथा आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य

उजनीत गावरान दुधापासून बनवली जाणारी बासुंदी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जीआय मानांकन मिळाल्यास बासुंदीला जागतिक ओळख मिळेल. यामुळे गावात उद्योग व रोजगार निर्मिती होऊन गावातील अर्थकारणाला चालना मिळण्यास मदत होईल. गावचा सुपुत्र या नात्याने यासाठी प्राधान्याने प्रयत्न करेन.
- डॉ. अशोक ढवण, उजनीचे सुपुत्र तथा कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live