उल्हासनदी घेणार मोकळा श्वास; ड्रोनच्या सहाय्याने जैविक प्रक्रिया करणार

अजय दूधाने
शुक्रवार, 4 जून 2021

उल्हास नदीच्या पात्रातील वाढते प्रदुषण सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. प्रदुषणामुळेच नदीपात्रात जलपर्णी फोफावली आहे.

उल्हास नदीच्या पात्रातील वाढते प्रदुषण सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. प्रदुषणामुळेच नदीपात्रात जलपर्णी फोफावली आहे. २००४ पासून उल्हास नदीच्या पात्रात जलपर्णी दिसू लागली. गेल्या काही वर्षात तर नदीपात्रात ३० किलोमिटर क्षेत्रात जलपर्णीचा विळखा होता. दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यासोबत ही जलपर्णी वाहून जाते. परंतु, नोव्हेंबर महिन्यात ही समस्या पुन्हा डोकं वर काढते.

जलपर्णीच्या आच्छादनामुळे नदी पात्रातील पाण्याची शुद्धता धोक्यात येते. स्थानिक ग्रामस्थांना मासेमारी करता येत नाही. नौकेतून प्रवास करता येत नाही. यंदा उल्हास नदी बचाव कृती समिती आणि सगुणा रूरल फाउंडेशन या दोन संस्थांनी जैविक प्रक्रियेद्वारे जलपर्णी हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. (Ulhasa river will take a deep breath; Biological processes with the help of drones) 

हे देखील पाहा 

पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या मोहिमेसाठी मदत दिली. १३ एप्रिल रोजी उल्हासनगर जवळील कांबा आणि वरप गावाजवळील  नदीपात्रातील जलपर्णी हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. आपटी, जांभूळ,एरंजाड परिसरातील नदीपात्रात जलपर्णीवर ड्रोनच्या सहाय्याने जैविक प्रक्रिया करण्यात आली त्याचे परिणाम आता दिसू लागले असून नदीपात्रातील जलपर्णी मृत होऊन ती आता विरळ होऊ लागली आहे. 

राज्यात प्रथमच नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक फवारणी करण्यात आली. मात्र  त्याआधी ती सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यात आली आहे.  या मोहिमेसाठी सीएसआर योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र आता सुरु असलेल्या या मोहिमेमुळे पुढील वर्षी उल्हासनदी मोकळा श्वास घेऊ शकणार आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live