उल्हासनगरमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळला; तिघांचा मृत्यू

अजय दुधाणे
शनिवार, 15 मे 2021

उल्हासनगरमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. उल्हासनगरच्या कॅम्प परिसरातील मोहिनी पॅलेस इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला.

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. उल्हासनगरच्या कॅम्प परिसरातील मोहिनी पॅलेस इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला. Ulhasnagar Building Collapsed Three Killed

हे देखिल पहा  

मोहिनी पॅलेस ही इमारत जवळपास 25 वर्षे जुनी असून त्यात 9 कुटुंब वास्तव्याला होती. आज दुपारी 3 च्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला. यामध्ये इमारतीतील 13 जण जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

महाराष्ट्र गुजरात सीमेवर आरटीपीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे

तर काही जणांना फायर ब्रिगेडनं शिडीच्या सहाय्याने बाहेर काढलं. मात्र या घटनेत अजूनही काही जण बेपत्ता असून ते ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त होतेय. त्यामुळेअग्निशमन दलाकडून इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. Ulhasnagar Building Collapsed Three Killed

 


संबंधित बातम्या

Saam TV Live