कुटुंबातील दोन कर्ते पुरुष व आईचा दुर्दैवी मृत्यू, दोन जावांसह चार चिमुकले उघड्यावर

वर्धा
वर्धा

वर्धा : कोरोना Corona महामारीच्या लाटेत जिल्ह्यातील अनेक परिवार Family उध्वस्त झालेत असाच सेलु नगरपंचायतीत राहणारा शेंडे परिवार आहे. दोन भावंडाच्या संयुक्त कुटुंबातले आईसह दोन्ही भावंडांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे घरातील तीनही जण कर्ते व कमावते होते. The Unfortunate Death of 3 Members Of Family In Wardha 

त्यांच्या पश्चात कमवता आता घरात कुणीही उरलेला नाही उपचारासाठी भरलेले पैसे परत करुन रुग्णालयाने माणुसकी दाखवली आहे. असे असले तरी चार चिमुकल्यासह या दोन्ही जावाचा संसार उध्वस्त  झाल्याने समोरील भविष्याची वाटचाल कशी करावी हा डोंगराएवढ़ा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. 

सर्व चांगलं होतं खेळता परिवार होता सर्वजण एकत्र राहत होतो सर्व सुखदुःखाचा एकत्र सामना करत होतो. असं काही घडेल असं पण वाटत नव्हतं , इतक्या लवकर घडत गेलं की काहीच सुचल पण नाही सर्वांचा प्राण एकमेकांमध्ये होता. The Unfortunate Death of 3 Members Of Family In Wardha 

हे देखील पहा -

एक गेल्याने दुसऱ्याने प्राण सोडला दोघे गेल्याने तिसऱ्याने प्राण सोडला कोणालाच जगावसं नाही वाटलं का ? त्यांनी पण कोणाचा विचार नाही केला त्यांच्यामागे आमचं काय होईल आमच्या मुलांचं काय होईल डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पैसाही भरपूर लावला पण काहीच उरलं नाही पुढे  कस जगावं अशी खंत सविता विलास शेंडे यांनी व्यक्त केली.   

वृषभ कांबळी यांनी बहिणीचा संसार उद्ध्वस्त Destroy झाल्याची भावना व्यक्त करताना सांगितले कि, माझ्या बहिणीचे पती कैलास मारोतराव शेंडे यांना अचानक हलका सर्दी- खोकला आणि बारीक ताप आठ दिवसापासून असल्याने आम्ही करोना टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नागपूरच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले.The Unfortunate Death of 3 Members Of Family In Wardha 

पाठोपाठ  आईला पण भरती केले, चार दिवसातच कैलास शेंडे यांचे निधन Death झाले. पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आई उषा शेंडे यांचे निधन झाले या सर्वांची देखभाल विलास भावजी हे करत असताना तेही कोरोना बाधित झाले चार दिवसांनी त्यांचा ही सावंगी मेघे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  दहा दिवसाच्या आत घरातील तीन कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाला. 

करोनाच्या महामारीत संयुक्तिक कुटुंब उध्वस्त झालं आहे. कमावत्या व्यक्ती अशा अचानक सोडून गेल्याने उदरनिर्वाह आणि पुढील जीवन व्यतीत करण्यासाठी आवश्यक उत्पन्नाचे कुणाकडेच साधन उरलं नाही. तर चार चिमुकली मुलं वडीलांचे छत्र छाया हरवल्याने एकाकी पडली आहेत. पुढील भविष्य अंधारमय आहे प्रकाशाची वाट कशी मिळेल याकडे दोन्ही जावा बघत आहेत.The Unfortunate Death of 3 Members Of Family In Wardha 

सविता विलास शेंडे यांचे पती नुकतेच मापारी कामगार म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करायला लागले होते. माहेरची आणि सासरची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने आम्हाला कधीच बाहेर पडायची गरज भासली नाही.मात्र काळाने असा घात केला की एकाएकी पाडलं.  

कर्ता पुरुष  एकही नाही राहिला जे साधन होतं तेही चाललं गेलं दवाखान्यात भरपूर पैसा लागला हातात काहीही शिल्लक राहिलं नाही.मात्र मुलांसाठी जगायचं आहे, त्यांना वाढवायचं आहे संयुक्तिक कुटुंब आहे दोघांचे मिळून आमच्याकडे चार लहान मुलं आहेत पुढे काय करायचं हे कुणालाच कळत नाही. अशी दुःखद प्रतिक्रिया सविता शेंडे यांनी दिली. 

Edited By : Krushnarav Sathe 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com