अज्ञाताने कांदा चाळ पेटवून दिली ; ५५ टन कांदा जळून खाक

Onion
Onion

बारामती : एकीकडे शेतीमालाला भाव नाही, दुसरीकडे कोरोनाचा Corona कहर अश्या चक्रव्यूहात अडकलेल्या कांदा Onion उत्पादक शेतकरी Farmer नाना वसंत जगताप राहणार कासुर्डी ( कामठवाडी) ता.दौंड जिल्हा पुणे Pune यांच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने आग Fire लावली. यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. The unidentified man lit the onion chawl; Burn 55 tons of onion

चाळीत एकूण ५५ टन कांदा होता. प्रशासनाने Administration लावलेल्या संचारबंदीत कांद्याला भाव नाही विक्री Sale व्यवस्थाही विस्कळीत झाल्याने जगताप यांनी कांदा वखारीत साठवून ठेवला होता. काही दिवसांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने कांदा वखारीत ठेवला होता. या साऱ्या कांद्याच्या घडामोडींवर मात करत कासुर्डी Kasurdi कामठवाडी येथील शेतकरी नाना जगताप यांनी दोन पैसे मिळतील या आशेपोटी कांदा वखारीत लावून ठेवला होता.

हे देखिल पहा - 

परंतु दिनांक ७ मे रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घराजवळ अवघ्या सहाशे फूटावर असलेली कांद्याची वखार अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने जगताप यांचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीला आपोआप आग लागण्याची शक्यता नाही कोणी तरी विकृत व्यक्तीने हे कृत्य केल्याचा संशय आहे अशी तक्रारही जगताप यांनी यवत पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. The unidentified man lit the onion chawl; Burn 55 tons of onion

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडल अधिकारी दीपक कोकरे, कृषी सहाय्यक अधिकारी स्नेहल थेऊरकर यांच्याकडून घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. कासुर्डी कामठवाडी परीसरातील शेतकऱ्यांकडून अशा विकृत मनोवृत्तीचा जाहीर निषेध होत आहे.

आर्थिक मदतीची अपेक्षा, लॉकडाऊन Lockdown काळात कांद्याला भाव नाही तर दुसरीकडे कोरोनाचा कहर चालू असतानाच शेतकरी नाना जगताप यांनी साठवून ठेवलेला कांदा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने मातीमोल ठरला आहे. नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने जगताप हे पूर्णपणे हतबल झाले आहेत. जगताप यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवली आहे. 

Edited By - Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com