केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25 खासदारांची भेट 

amit shaha narendra modi.jpg
amit shaha narendra modi.jpg

वृत्तसंस्था :  मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 25 खासदार आणि मंत्र्यांची भेट घेतली.  त्यानंतर  सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत मोदी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी-रविवारी गुजरात आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातील भाजपा खासदार अमित शहा यांच्या निवासस्थानी जमले होते. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी अन्य राज्यांसह उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधील भाजप खासदारांशी चर्चा केली.  (Union Cabinet Expansion: Amit Shah Meets 25 BJP MPs) 

गेल्या दोन वर्षात सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि केंद्राला भेडसावणाऱ्यां मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत वैयक्तिक बैठक पार पडली.  या बैठकीत राजनाथ सिंह, नितीन गडकरी, डीव्ही सदानंद गौडा आणि राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आदी उपस्थित होते.  मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या इशारा देणाऱ्या  बैठकींच्या मालिकांमधील ही पाचवी बैठक होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी.  नड्डा यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत चर्चा केली.

मोदी सरकारमध्ये सध्या 22 कॅबिनेट, 9 स्वतंत्र प्रभार आणि 29 राज्यमंत्री आहेत. अशाप्रकारे, एकूण मंत्री संख्या 68 आहे, तर पंतप्रधानांसह 82 मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात येऊ शकतात. अशा परिस्थितीत मोदींच्या  मंत्रिमंडळात अद्याप 22 मंत्र्यांची पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात सुमारे दीड डझन नवीन मंत्र्यांना संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.  शिवसेना आणि अकाली दलाशी युती तुटल्याने आणि अनेक नेत्यांच्या मृत्यूमुळे जवळपास अर्धा डझन मंत्र्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. एकाच वेळी  एकापेक्षा जास्त विभागाच्या कामाचा भार असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची कामे हाताळणारे मंत्री त्यांच्या कामाकडे फारसे लक्ष देऊ शकत नाहीत.

याशिवाय कोरोना साथीच्या आजारामुळे पंतप्रधान मोदी यांना इच्छा असूनही मंत्रिमंडळात वाढ करता आली नाही. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट  ओसरत असल्याने मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे.  यावेळच्या मंत्रीमंडळ विस्तारात मित्रपक्षांचा समावेश करण्याची विशेष तयारी करण्यात आली आहे.  एनडीएच्या ऐक्याचा मोठा राजकीय संदेश देशाला आणि विरोधी पक्षांना दिला जावा यासाठी, पंतप्रधान मोदी विशेषत: मित्रपक्षांना जोडण्यास उत्सुक आहेत. 

यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना पूर्वीपेक्षा जास्त संधी दिली जाऊ शकते. बिहारमध्ये भाजपा जेडीयूबरोबर युती करून सरकार चालवत आहे.  आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीदेखील  जेडीयू नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास संमती दर्शवली आहे. यामुळे जेडीयूला मंत्रिमंडळ विस्तारात योग्य प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते.  असा अंदाज राजकीय तज्ञांनी वर्तवला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com