कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वं जाहीर

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना उपचारासाठी मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 

मुंबई : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेत Third Wave लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून Union Ministry of Health कोरोना उपचारासाठी मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून सविस्तरपणे देण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये लहान मुलांसाठी रेमडेसिविर Remedisivir इंजेक्शनची शिफारस करण्यात आलेली नाही. तसेच रुग्णालयात दाखल गंभीर कोरोना रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे. Union Ministry of Health announces guidelines for treatment of third wave of corona

“लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस नाही !

रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आहे,” असे सांगण्यात आले आहे. दरम्यान सहा मिनिटं वॉकची, १२ वर्षांपुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. जर अनियंत्रित अस्थमा Asthama असेल तर त्यांना या वॉक टेस्टची शिफारस करण्यता आलेली नाही.

11 जून पासून प्रत्यक्ष RTE प्रवेशाला सुरुवात

ऑक्सिजन थेरपी-

कोरोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी Oxygen Therapy त्वरित सुरू केली जाणं आवश्यक आहे. इलेक्ट्रोलाइट आणि द्रवचे संतुलन राखले जाणं आवश्यक आहे. तसेच कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असेही सांगण्यात आलं आहे.

गंभीर कोरोना रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली -

लक्षणं नसणाऱ्या किंवा सौम्य कोरोना केसेसमध्ये उत्तेजक Steroids वापरणे अधिक धोकादायक ठरु शकतात. यामुळे गंभीर आजारी असलेल्या कोरोना रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्यात यावे असे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. “स्टिरॉईड हे योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात तसेच योग्य काळापुरती घेतली जावीत,” असेदेखील मार्गदर्शक तत्वात सांगण्यात आले आहे.

काळ्या बुरशीचा संसर्ग निर्माण होण्यामागचे कारण- 

तज्ञांच्या मते, देशात काळ्या बुरशीचा Black fungus संसर्ग निर्माण होण्यामागचे कारण स्टिरॉईडसचा र्रासपणे होणारा वापर हे आहे. तसेच पाच वर्षांखालील मुलांना मास्क Mask लावू नका, आणि ६ ते ११ वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क लावण्यास सांगावे असे, सांगण्यात आलं आहे.

हे देखील पहा - 

या दरम्यान यावेळी अत्यंत गरज असेल तरच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लहान मुलांच्या सीटी स्कॅन साठी डॉक्टरांनी सांगावे असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live