काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर गाजर आणि लॉलीपॉप देऊन अनोखे आंदोलन...

अजय दुधाणे
सोमवार, 7 जून 2021

उल्हासनगर मध्ये महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर गाजर आणि लॉलीपॉप नागरिकांना देऊन, अनोखे प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे.

उल्हासनगर : उल्हासनगर मध्ये महागाई विरोधात काँग्रेसच्या Congress वतीने पेट्रोल पंपावर गाजर Carrots आणि लॉलीपॉप Lollipop नागरिकांना देऊन, अनोखे प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे. 2013 मध्ये 430 रुपयात मिळणारा गॅस Gas सिलेंडर आता 850 रुपयात खरेदी करावा लागत आहे. Unique agitation at petrol pumps on behalf of Congress against inflation

इंधन दरवाढी विरोधात 'दुचाकी भंगारात विकून' काँग्रेसचे आंदोलन

मोदींनी अच्छे दिन म्हणून देशवासियांना आश्वासनांचे गाजर आणि लॉलीपॉप दिले आहे. आज अच्छे दिन नव्हे, तर वाईट वेळ देशवासीयांवर मोदी सरकारने आणली आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल Petrol, डिझेलची Diesel दरवाढ Rate शंभरी गाठल्याने देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना पंतप्रधान मोदी Modi यांच्या प्रतिकात्मक व्यक्तीस विजयी कप देऊन उल्हासनगर काँग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला आहे.

हे देखील पहा  

तसेच यावेळी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना मोदी सरकार Government देशवासीयांना दिलेल्या आश्वासनाचे उपहासात्मक लॉलीपॉप आणि गाजर आंदोलकाना देऊन मोदी सरकार विरोधात घोषणा देऊन आंदोलन केलं आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांबाबत मोदींजींचे धोरण आणि त्यांच्या वर्तनाचा निषेध आणि त्यांचे हे रूप जनतेच्यासमोर आणण्यासाठी अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आले, असे उल्हासनगर शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले आहे. 

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live