चंद्रपूरच्या युवकांचा अनोखा पुढाकार.. 

Unique initiative of the youth of Chandrapur
Unique initiative of the youth of Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील वरोरा Varora शहरात कोविड Covid संकट काळात युवकांनी ऑक्सिजन Oxygen पुरवठा करण्यासाठी दाखविलेला पुढाकार इतरांसाठी आदर्श ठरला आहे. शहरातील 'गांधी उद्यान Gandhi Udyan योग मंडळाचे' कार्यकर्ते सध्या 'प्राणवायू पथक' म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. Unique initiative of the youth of Chandrapur 

कोरोना Corona हॉटस्पॉट Hotspot बनलेल्या वरोरा शहरात हे 'प्राणवायू पथक' अथक परिश्रम करत रुग्णांपर्यत मोफत ऑक्सिजन सिलिंडर पोचवत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आकडेवारी सातत्याने वाढत आहे. शहरी आणि ग्रामीण भाग याला अपवाद नाही. चंद्रपूर- वरोरा- ब्रम्हपुरी Bramhapuri- चिमूर हे तालुके बाधितांच्या आकडेवारीत अग्रभागी आहेत. 

पुढील १० दिवसात १८ हजार सक्रिय बाधितांचा आकडा दुप्पट होण्याचा अंदाज आहे. एकीकडे जिल्ह्यात रुग्णांसाठी खाटांची प्रचंड कमतरता असताना दुसरीकडे ऑक्सिजनची सोय करताना नातेवाईकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. वरोरा येथे गांधी उद्यानात नियमितपणे योगाभ्यास Yoga करणारे युवक यासाठी काय उपाय करता येतील याच्या शोधात होते. ऑक्सिजन पुरवठा करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. Unique initiative of the youth of Chandrapur 

मात्र, सदस्यांपैकी कुणीही यात तांत्रिक प्रशिक्षित नसल्याने सेवा सुरू करणे धाडस होते. ऑक्सिजनविना प्राण जात असताना फारसा विचार करायला वेळ नव्हता. ३ सिलिंडरसह कामाला सुरवात केली. आता यात मोठी वाढ झाली आहे. या सेवेची माहिती झाल्यावर रोज कार्यकर्त्यांना सुमारे १०० कॉलस् येत आहेत. 

सिलिंडर भरून आणण्यासाठी चंद्रपूर MIDC गाठावी लागत आहे. मात्र, सर्व अडथळे पार करून बेडवर हतबल पडून असलेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी 'प्राणवायू पथक' सर्वशक्तीने कार्यरत आहे. सिलिंडर पोचविणे, सॅनिटाईज करणे, मोफत मास्कची Mask सोय करून कोरोना संकटकाळात वरोरा येथील 'गांधी उद्यान योग मंडळ' सदस्य करत असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. 

Edited By- Digambar Jadhav
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com