लस घ्या, बाकरवडी न्या - पुण्याच्या चितळे बंधूंचा लसीकरणासाठी पुढाकार !

Unique solution of Chitale group for vaccination of  in Pune
Unique solution of Chitale group for vaccination of in Pune

पुणे:  बातमी आहे पुण्यातून, जर तुम्ही कोरोनाची लस Vaccination घेणार असाल तर पुण्याची प्रसिद्ध असलेली चितळे बंधूंची बाकरवडी तुम्हाला भेट  म्हणून मिळणार आहे. Unique solution of Chitale group for vaccination of  in Pune

पुण्यामध्ये कोरोनाचा Corona वाढता संसर्ग पाहता अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी पुण्यात ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. कोरोनाची लस घेणाऱ्या नागरिकांना चितळे बंधूंकडून चक्क बाकरवडीचे Bakarwadi पाकीट दिलं जाणार आहे, पुण्यामध्ये Pune कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, रोज हजारोंच्या संख्येने लोक बाधित होत आहेत, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवणं ही अतिशय गरजेचं आहे. 

जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं या हेतूने त्यांना चक्क फेमस चितळे बंधूंची Chitale Bandhu Mithaiwale बाकरवडी Bakarwadi मिळणार आहे.  पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सच्या माध्यमातून चितळे बंधू मिठाईवाले यांनी हा पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून आठवडाभरात मिळून साधारण 15 हजार बाकरवडीची पाकिटे वाटण्यात येणार आहेत.

मात्र साठी कोणतेही लसीकरण केंद्र Vaccination Centre ठरवण्यात आलेले नाही. "आम्ही कोणत्याही एका केंद्रावर बाकरवडीची पाकिटे देणार नाही. तर वेगवेगळ्या केंद्रांवर स्वयंसेवांमार्फत पाकिटे दिली जाणार आहेत. केंद्र जाहीर केल्यास गर्दी होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे." अशी माहिती चितळे उद्योग समूहाचे साथीदार संजय चितळे यांनी दिली आहे.  

अशा अनोख्या पुढाकारामुळे अधिकाधिक नागरिक उत्सुकतेने लस घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला 1 लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व स्तरातून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे. 

Edited By- Sanika Gade.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com