हिंगोलीतील ऑक्सिजनमॅनचा अनोखा उपक्रम... 

hingoli oxygen man
hingoli oxygen man

हिंगोली : हिंगोली Hingoli मध्ये सामाजिक वनीकरण विभागात ऑक्सीजन मॅन Oxygen Man म्हणून ओळख असणाऱ्या अधिकाऱ्याने ३४ वर्ष वन सेवेत आपले कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पुढील आयुष्य, स्वतःच्या कारकीर्दीत लावलेली झाडे जगविण्यात घालण्याचा संकल्प केला आहे. किसन देशमुख Kisan Deshmukh असे या ध्येय वेड्या अधिकार्‍याचे नाव असून, देशमुख हे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी Kalamanuri मध्ये कार्यरत होते. A unique venture of Oxygenman in Hingoli  

वाळवंटाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळमनुरी शहरासह संपूर्ण तालुक्यात शासनाच्या १३ व ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत Tree planting activities देशमुख यांनी झाडांचे नंदनवन फुलवले आहे. भीषण दुष्काळ व पाणीटंचाईच्या काळात देखील देशमुख यांनी लागवड केलेल्या झाडांपैकी तब्बल ८० टक्के झाडे जगवली आहे. देशमुख यांनी फुलविलेली वनराई पाहण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्य वन प्रधान सचिव विकास खारगे Vikas Kharge यांच्यासह परराज्यातील अधिकारी व मंत्र्यांनी हिंगोलीत भेटी दिले आहेत. 

दरम्यान ३ वर्षांपूर्वी लागवड केलेली ही झाडे आता काही प्रमाणात मोठी झाली आहेत. मात्र, आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील झाडांची देखभाल करणार असून, ही झाडे मोठी होईपर्यंत त्यांनी झाडांची काळजीपूर्वक सेवा बजावणार असल्याचा संकल्प देशमुख यांनी केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, देशमुख हे दोन दिवसापूर्वी सेवानिवृत्त Retired झाल्याने त्यांना निरोप देताना त्यांचे सहकारी असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. 

Edited By- Digambar Jadhav
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com