हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा अनोखा प्रकार; पाहा VIDEO

ghatkopar case
ghatkopar case

मुंबईसह (Mumbai) राज्यामध्ये सध्या हनीट्रॅपची प्रकरणे (Honey trapping) मोठ्या प्रमाणत वाढत आहेत. काही टोळ्या तरुणींच्या मदतीने अनोळखी तरुणांना स्वतःच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांची संपूर्ण टोळी या तरुणांना किडनॅप करते आणि मग सुरू होतो ब्लॅकमेलिंग चा खेळ. .(A unique way to get caught in a honeytrap see video)

मुंबईच्या घाटकोपर (Ghatkopar) विभागात राहणारा एक तरुण अश्याच एक हनीट्रॅपचा शिकार झाला होता. सुदैवाने त्याचा एक मित्र आणि वकील नितु सिंग यांनी वेळीच या तरुणाला मदत केली आणि हा तरुण या हनीट्रॅप मधून सुटू शकला आणि पैशा सोबतच त्याचा जीव ही वाचला आहे.

घाटकोपरमध्ये राहाणाऱ्या या पंचवीस वर्षीय मुलाला त्याच्या अट्टल गुन्हेगार असलेल्या मित्राने एका टोळीच्या मदतीने हनी ट्रॅप मध्ये अडकविले होते. काही दिवसांपूर्वी त्याच्या फोनवर एक अज्ञात तरुणीचा रॉग नंबर आला आणि त्या तरुणीने या तरुणाशी ओळख वाढवली, ते एकमेकांना एका लॉज वर भेटले आणि लॉज बाहेर येताच या तरुणीच्या साथीदारांनी या तरुणाला कीडनॅप केले आणि तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले तर तुझ्यावर बलात्काराचा आरोप लावू, तुझा मित्रांना कुटुंबाला यात अडकवणार अश्या धमक्या ही टोळी देऊ लागली. .(A unique way to get caught in a honeytrap see video)

सुदैवाने या तरुणाला त्याचा मित्र आणि वकील नितु सिंग यांनी मदत केली.धैर्य दिले आणि या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र असे गुन्हे मोठ्या प्रमाणत घडत असल्याचे वकिलांनी सांगितले.  या प्रकरणी साहिल नाडर, रणजित मोरे, अरबाज खान या आरोपींना घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ज्यात साहिल नाडर हा पीडित तरुणाचा मित्रच आहे आणि त्यानेच हा सर्व ट्रप रचला होता. सध्या यातील तीन जणांना अटक केली असून यातील त्या तरुणीसह आणखी आरोपींचा घाटकोपर पोलीस शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com