कोरोनाच्या लढाईत सर्वधर्मीयांची एकजूट, मुस्लिम बांधवांनी निर्माण केला आदर्श

साम टीव्ही
गुरुवार, 28 मे 2020

 

  •  
  • कोरोनाच्या लढाईत सर्वधर्मीयांची एकजूट 
  • कोरोनाला हरवण्यासाठी सगळेच एकवटले 
  • रमजान ईदच्या खर्चाला बगल देत मुस्लिम बांधवांनी निर्माण केला आदर्श

कोरोनाच्या लढाईत मुस्लिम समाजानं आदर्शवत असं काम केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईदच्या पैशातून दोन आयसीयू युनिट उभारलेयत. 

राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने चाललेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाविरोधात सर्व धर्म एकवटलेयत. याच संकटाच्या काळात रमजान ईद आली. मात्र, या ईदच्या खर्चाला बगल देत मुस्लिम बांधवांनी आदर्श निर्माण होईल असं काम केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सीपीआर रुग्णालय आणि इचलकरंजीतल्या आयजीएम रुग्णालयात दोन आयसीयू युनिट मुस्लिम बांधवांनी उभे केलेयत. सुमारे ६० लाख रुपये खर्च करून हे दोन युनिट उभारण्यात आलेयत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही या युनिटचं उद्घाटन करताना मुस्लिम बांधवांचे आभार मानलेत. 

रमजानच्या पवित्र महिन्यातली जकात, सदका आणि इमदादची रक्कम यासाठी वापरण्यात आलीय. बैतूलमाल समितीनं यासाठी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केलं. 

सध्या जगभरात संकट आहे. अशात धार्मिक सण साजरे करून पैशांचा अपव्यय करणं परवडणारं नाही. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजानं आदर्श घालून दिलाय. त्याचं अनुकरण प्रत्येक समाजानं करण्याची गरज आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live