अनलॉक केलेल्या 9 देशांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन, आपल्याकडेही लॉकडाऊनचं भूत डोक्यावर पुन्हा बसण्याची शक्यता,

साम टीव्ही
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

ही बातमी तुम्हा-आम्हाला विचार करायला लावणारी आहे... लॉकडाऊनच्या संकटातून बाहेर पडत आपण सध्या अनलॉकमध्ये वावरतोय..

ही बातमी तुम्हा-आम्हाला विचार करायला लावणारी आहे... लॉकडाऊनच्या संकटातून बाहेर पडत आपण सध्या अनलॉकमध्ये वावरतोय... पण, हाच अनलॉक अनेक देशांना महागात पडलाय... त्यामुळे आपण जर काळजी घेतली नाही तर आपल्याही डोक्यावर लॉकडाऊनचं भूत पुन्हा बसू शकतं

कोरोनामुळे भारतासह जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. पण, अर्थचक्र सुरू करण्यासाठी अनेक देशांमध्ये अनलॉक करण्यात आलं. आता महाराष्ट्रासह भारतातही अनलॉक करण्यात आलाय. सुदैवाने कोरोनाग्रस्तांचे आकडे कमी होतायत, मात्र त्यात आता एक चिंताजनक माहिती हाती आलीय. अनलॉक केलेल्या 9 देशांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आलंय.

अनलॉक केलेल्या ब्राझिल, फ्रान्स, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलाय. त्याचसोबत, इंग्लंड, जर्मनी, बेल्जियम, ग्रीस, इटली, स्पेनही पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय.
ही सगळी परिस्थिती पाहता, आपण यातून हेच शिकायला हवं की, भारतात जरी अनलॉक झालं असलं तरी, आपण बेफिकीरी करून चालणार नाही. कारण अनलॉक केलेलं असलं तरी कोरोना अजून गेलेला नाही आणि त्याच्यावर लसही अजून आलेली नाही. आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण असणारच. पण सण साजरे करताना कोरोनाची काळजी घ्यायलाच हवी. नाहीतर पुन्हा लॉकडाऊनच्या चक्रव्यूहात अडकावं लागेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live