उर्मिला मातोंडकर करणार कोणत्या पक्षात प्रवेश?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

मुंबई : उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता त्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या येत आहेत.

मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती. या भेटीवरुन ही चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसमध्ये असताना उर्मिला मार्तोंडकर यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मात्र, ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या मैत्रीपुर्ण संबधामुळे शिवसेनेवर त्यांनी कधीही टिका केली नव्हती.

'मातोश्री'नेही उर्मिला मातोंडकर यांच्याशी मराठी लेक म्हणूनच मैत्रीचे संबध कायम ठेवले होते. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र ही चर्चा राजकीय नसून ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या संबधामुळे चर्चा झाली असल्याचा खुलासा शिवसेना नार्वेकर यांनी केला आहे.

या भेटीला कुणीही राजकीय रंग देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र, काँग्रेसला राम राम केल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर भगवा खांद्यावर घेणार का...? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

Web Title: Urmila Matondkar may be joined Shivsena
 
संबंधित बातम्या

Saam TV Live