अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा चीनवर खळबळजनक आरोप

साम टीव्ही
शनिवार, 2 मे 2020
  • कोरोनाच्या विषाणूला चीननेच जन्माला घातलं?
  • वुहानच्या प्रयोगशाळेतच जीवघेण्या विषाणूची निर्मिती?
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपाने खळबळ

जगभरात कोरोनाच्या बकासुराने लाखो लोकांचे जीव घेतलेत. भारतासह जगातील प्रत्येक देश कोरोनाच्या संकटामुळे हैराण झालाय. कोरोनावर औषध शोधण्याचं कामही जोरात सुरूय. मात्र, त्याचसोबत कोरोना कुठून आला त्याबाबतही तर्क-वितर्क लढवले जातायत. चीनमधल्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने चीनकडे संशयाने बघितलं जातंय. त्यातच चीनचा जागतिक राजकारणाचा घातपाती इतिहास पाहता चीनवरील संशयाची सुई अधिकच टोकदार बनलीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर चीनवर तसा थेट आरोपच केलाय.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी हा आरोप केलेला असला तरी, इतर देश मात्र त्याबाबत दबक्या आवाजात चर्चा करताना दिसतायत. असं असली तरी संपूर्ण जगाचा संशय चीनवर असल्याचं सातत्याने समोर येतंय.

मुळात, चीनकडूनही कोरोनाबाबत अनेकदा चुकीचे आकडे देणं, खोटे दावे करणं अशा गोष्टी घडल्यायत. त्यामुळे चीन लपवाछपवी का करतंय असाही सवाल जगभरातून विचारला जातोय. चीनने जगातील अनेक देशांच्या बाजारपेठांवर कब्जा केलेला आहे, त्यामुळे अनेक देशांच्या आर्थिक जडणघडणीत चीनचा वाटा असल्यानेच चीन कोणालाही जुमानत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर चीनची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि त्यात जर चीन दोषी असेल तर चीनसोबत व्यवहार करावा का याबाबत संपूर्ण जगानेच विचार करण्याची वेळ आलीय, हे मात्र नक्की

WEB TITLE - US President Donald Trump's accusations against China again


  


संबंधित बातम्या

Saam TV Live