लोकमान्य हॉस्पिटलचा धक्कादायक प्रकार, वापरलेली इंजेक्शन फेकली उघड्यावर

भूषण अहिरे
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.लोकमान्य हॉस्पिटलच्या परिसरामध्ये हॉस्पिटल मधील रुग्णांचे नमुने घेतल्यानंतरचे साहित्य आणि  इंजेक्शन उघड्यावरतीच फेकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

धुळे - कोरोना Corona रुग्णांवर उपचार केले जात असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलचा Lokmanya Hospital धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोकमान्य हॉस्पिटलच्या परिसरामध्ये हॉस्पिटल मधील रुग्णांचे नमुने घेतल्यानंतरचे साहित्य आणि  इंजेक्शन Vaccine उघड्यावरतीच फेकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धुळे Dhule शहरामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे रोज कोरोना रुग्णांच्या मृतांची आकडेवारी देखील वाढताना बघायला मिळत आहे. used injection thrown in the open

याच रुग्णालयाच्या परिसरात गेल्या आठवड्यात देखील मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले इंजेक्शन व रुग्णालयातील वापरात आलेले इतर साहित्य रस्त्यावरती फेकलेले आढळून आले  त्यानंतर परिसरातील नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनातर्फे तात्काळ रस्त्यावरची फेकलेले इंजेक्शन व इतर वस्तू उचलण्यात आले होते. परंतु तशीच काहीशी परिस्थिती आठवडाभरानंतर आत्ता देखील बघावयास मिळत आहे. हॉस्पिटल प्रशासनाने या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर धुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते. 

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live