अमेरिकेच्या नोव्हावॅक्स लसीला भारतात लवकरच मिळू शकते आपत्कालीन मंजूरी 

novavax Vaccine.jpg
novavax Vaccine.jpg

नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सने Novavax तयार केलेल्या लसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निकाल समोर आला आहे.  नोव्हावॅक्सची  ही लस सौम्य, मध्यम आणि गंभीर रोगात कोरोनाव्हायरस विरूद्ध 90.4% प्रभावी असल्याचे या अहवालात आढळले आहे. अशा परिस्थितीत, आता नोव्हावॅक्सच्या अंतरिम डेटाच्या आधारे केंद्रसरकार लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला Serum Institute of India  या लसीचे उत्पादन करण्याची मान्यता देऊ शकते. नोव्हावॅक्स आणि सीरम यांनी एका वर्षात कोरोना लसीचे 200 कोटी डोस (एका महिन्यात 5 कोटी) तयार करण्याचे करार केले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा करार झाला होता.  त्यानुसार येत्या  सप्टेंबर-डिसेंबर पर्यंत  लसीचा पुरवठा प्राप्त होईल,  अशी अपेक्षा आहे.  तसेच गरजेनुसार पुढील डोसची संख्या वाढवण्यात येणार आहे. (The US's Novavax vaccine could soon be approved for emergency use in India) 

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी नोव्हाव्हॅक्स  अत्यंत प्रभावी ठरली आहे.  चांगल्या निकालांमुळे लवकरच या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता मिळू शकते. जगभरातील लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हे निकाल जाहीर केले आहेत. करारानुसार किमान आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी आणि भारतासाठी किमान 100 दशलक्ष डोस तयार केले जाणार आहेत. भारतात नोव्हावॅक्सची लस  'कोवाव्हॅक्स' 'Covavax या नावाने ओळखली जाईल.  सध्या एसआयआय 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 1600 लोकांवर या लसीची चाचणी घेत आहे. याशिवाय लवकरच लहान मुलांवर देखील या लसीच्या चाचण्या होण्याची शक्यता आहे.  

नोव्हावॅक्स लॅबमध्ये तयार केलेल्या प्रोटीनच्या प्रतीपासून नावण्यात आली आहे.  सध्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या इतर काही लसींपेक्षा ती वेगळी आहे. नोव्हावॅक्स लस मानक रेफ्रिजरेटर तपमानावर ठेवली जाऊ शकते आणि ती वितरण करण्यासही सोपी आहे. चाचणीत, ही लस कॅंटमध्ये आढळलेल्या अल्फा व्हेरीएंटवर 86 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेल्या व्हेरीएंटविरुद्ध नोव्हावॅक्सची कार्यक्षमता 49 टक्के इतकी  होती. या लसीचे दुष्परिणाम सौम्य असल्याचे दिसून आले.

Edited By -  Anuradha Dhawade 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com