अंबरनाथ मधील लसीकरण दुपारपासून ठप्प..

अजय दुधाणे
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फेक्टरी मधील नगरपालिकेने शहरातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र स्थापन केले आहे. दरम्यान आज मात्र लसींचा तुटवटा भासल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे

अंबरनाथ : अंबरनाथ Ambernath येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मधील नगरपालिकेने शहरातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र Vaccination Center स्थापन केले आहे. दरम्यान आज मात्र लसींचा तुटवटा भासल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अचानक झालेल्या लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण ठप्प झाले. परिणामी भर उन्हात लसीकरणासाठी रांगा लावलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी परतावे लागले आहे.

पुरवठा ठप्प झाल्याने सकाळ पासून नागरिकांचे हाल होत आहेत. अंबरनाथ शहरात फक्त ऑर्डनन्सच्या हॉस्पिटल Hospital मध्ये लस देण्याचे काम चालू आहे, आज सकाळी तेथे लस संपल्यामूळे नागरिक हैराण झाले आहेत. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ Parshant Rasal यांच्याकडे या विषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर व अन्य शहरामध्ये राज्यशासनाकडून  लसीचा पुरवठा नियमित पणे झाला नसल्याने नागरिकांना लस देण्याचे काम ठप्प झाले आहे. Vaccination in Ambernath stopped from noon

अंबरनाथ मध्ये राज्य शासनाकडून नागरिकांना लसीकरण देण्याचे काम सुरु झाल्यापासून आजपर्यंत १३३३० (पहिली लस ) आणि २२७८ (दुसरी लस) एवढ्या लोकांना लस देण्यात आली आहे. आगामी एक दोन दिवसात राज्य शासनाकडून लस पुरवठा सुरू होणार असून त्यानंतर नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होईल. लसीकरण बंद झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत असले तरी अजून लसीकरण वाढवा अशी मागणी नागरिक करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav
 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live