परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम 

चेतन इंगळे
बुधवार, 2 जून 2021

शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मिरा भाईंदर Mira Bhayandar महानगरपालिकेतर्फे  विशेष लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती.

मिरा भाईंदर: शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मिरा भाईंदर Mira Bhayandar महानगरपालिकेतर्फे  विशेष लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती. या अगोदर ही लसीकरण मोहीम १ जूनला करण्यात आली होती. येत्या 5 जूनला देखील उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. Vaccination campaign for students going abroad

परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना कोरोना लस Corona Vaccine घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतू लस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. यासाठी मुंबई BMC आणि ठाणे महापालिकांनी Thane Municipal Corporation या विद्यार्थ्यांना लस देण्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारले आहे.

पुणेकरांची खरेदीसाठी उसळली मोठी गर्दी... 

याच धर्तीवर मिरा भाईंदर महानगरपालिकेने देखील स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करावे अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. या मागणीनुसार महापालिकेने भाईंदर पश्चिम येथील नगरभवन याठिकाणी  टोकन पद्धतीने लसीकरण केंद्र १ जून पासून सुरु करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले Dilip Dhole यांनी घेतला होता. Vaccination campaign for students going abroad

हे देखील पहा-

विद्यार्थी ज्या देशात शिक्षणासाठी जाणार आहेत त्याची कागदपत्रे तपासून त्यानुसार एक जून व दोन जून या दिवशी दुपारी १२ ते ४ यावेळेत लसीकरण करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा ViSa अद्याप मिळाले नसल्याने त्यांचे लसीकरण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा 5 जून रोजी लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live