लसीकरण बंद असल्याने १८ वर्षावरील नागरिक लसीकरणापासून वंचित

भूषण अहिरे
सोमवार, 3 मे 2021

केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने एक मे पासून अठरा वर्षांच्या वरील वयोगट असलेल्या सर्वांनाच लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी लसींचा  तुटवडा असल्या कारणाने लसीकरण केंद्र अद्यापही टाळेबंदीतच आहेत.

धुळे :  कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. तर  दुसरीकडे केंद्र सरकारने Central Government तसेच राज्य सरकारने State Government एक मे पासून अठरा वर्षांच्या वरील वयोगट असलेल्या सर्वांनाच लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी लसींचा तुटवडा Shortage असल्या कारणाने लसीकरण केंद्र Vaccination centers अद्यापही टाळेबंदीतच आहेत. Vaccination centers are closed due to shortage of vaccines in dhule

शिरपूर Shirpur तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय मध्ये देखील लस Vaccine उपलब्ध नाही. आणि त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णालयाच्या बाहेर लसीकरण बंदचा फलक लावावा लागला आहे. शिरपूर तालुक्यात मोठ्या संख्येने युवक Youth वर्ग आहे. परंतु लसीकरण केंद्र बंद असल्यामुळे युवकांना लसीकरणापासून दूर राहावे लागत आहे.

त्यामुळे लवकरात लवकर लसींचा साठा शिरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुरवठा करण्याची मागणी युवकां तर्फे करण्यात येत आहे.

Edited By- Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live