१ मे पासून लसीकरण सुरू होणार नाही, राजेश टोपे यांची माहिती 

tope rajesh
tope rajesh

मुंबई - लसीकरणाचा Vaccination टप्पा १ मे पासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र लसीकरणाविषयी चर्चा सुरू झाली होती. या टप्प्यात  १८ ते ४४  वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता राज्यात या वर्गासाठी १ मे पासून लसीकरण सुरू होणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी जाहीर केलं आहे. Vaccination will not start from May 1

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये यासंदर्भातला निर्णय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असला, तरी येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

५ कोटी ७१ लाख नागरिकांना सुमारे २ कोटी डोसेसची गरज लागणार असून त्याचा अंदाजे खर्च ६,५०० कोटी इतका येईल. या लसींच्या खरेदीला मंजूरी मिळाली असून साधारणपणे एक डोस ४०० रूपयांचा आहे. राज्याला या वयोगटातील लोकांचे लसीकरण हे केवळ ६ महिन्यात पूर्ण करायचे आहे, पण त्या अनुषंगाने दर महिन्याला २ कोटी डोसेसची राज्याला गरज आहे, राज्याच्या आरोग्य विभागात ती क्षमता आहे. पण लसींच्या तुटवड्यामुळे या वयोगटातील लोकांचे लसीकरण इच्छा असूनही १ मे रोजी सुरू करणं शक्य नाही", असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. Vaccination will not start from May 1

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com