अमेरिकेतील हे कोरोनावर गुणकारी औषध, यशस्वी चाचणीने आशा पल्लवीत

साम टीव्ही
रविवार, 24 मे 2020
  • कोरोनावर गुणकारी औषध
  • अमेरिकेतील रुग्णांवर चाचणी
  • यशस्वी चाचणीने आशा पल्लवीत

कोरोनाच्या रुग्णांना लवकर बरं करु शकेल, असं एक औषध जगाच्या हाती लागलंय. अमेरिकेत काही रुग्णांवर या औषधाची चाचणी झालीए. आणि या चाचणीत समाधानकारक निष्कर्ष समोर आलेत.

रेमडेसिवीर हे नाव लक्षात ठेवा. कदाचित हाच कोरोनाचा कर्दनकाळ असेल. अमेरेकेतील कोरोना रुग्णांवर है औषध गुणकारी ठरलंय. या औषधाचा 10 दिवसांचा कोर्स रुग्णांना बरं करण्यात उपयुक्त ठरतोय.

अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर या औषधाची चाचणी करण्यात आली आहे... कोरोनाच्या ज्या रुग्णांना ऑक्सिजन थेरपीची गरज भासते आहे, असे रुग्ण या औषधाने लवरकर बरे होते आहेत. या चाचणीचे रिपोर्ट्स इतके उत्तम आले आहेत... की चाचणी सुरु असतानाच त्याचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आलेत... 

रेमडेसिवीर काय आहे? 

  • रेमडेसिवीर एक RNA पोलीमरेज़ इनहिबिटर इंजेक्शन आहे 
  • इबोलावर मात करण्यासाठी याची निर्मिती झाली होती
  • हे औषध अमेरिकेत बनवण्यात आलंय.
  • रेमडेसिवीर थेट व्हायरसवर हल्ला करतं
  • जगभरामध्ये कोरोनावर परिणामकारक औषध शोधण्याचं काम सुरु आहे... त्यातच रेमडेसिवीर हा एक आशेचा किरण. कोरोनाच्या विळख्यात जग असं काही अडकलंय... की आता प्रत्येक आशेचा किरण. महत्त्वाचा बनलाय. म्हणून रेमडेसिविर कोरोनाचा कर्दनकाळ ठरेल, अशी अपेक्षाय.. 
     


संबंधित बातम्या

Saam TV Live