कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठीच्या लसीची चाचणी, वाचा काय असतील फायदे...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 मे 2020

कोरोनाच्या उद्रेकाचा जगभरातून सामना होत असून भारतातही बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांवरील संभाव्य उपचारासाठी विकसित होणारी एमडब्ल्यू (मायक्रोबॅक्टिरियम डब्ल्यू) लसची प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली आहे. 

कोरोनाच्या उद्रेकाचा जगभरातून सामना होत असून भारतातही बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांवरील संभाव्य उपचारासाठी विकसित होणारी एमडब्ल्यू (मायक्रोबॅक्टिरियम डब्ल्यू) लसची प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली आहे. 

 काही दिवसांपूर्वी सेंट्रल मेडिकल  इंडस्ट्रियल रिसर्चने एमडबल्यू लसीची रुग्णावर चाचणी घेण्यास मंजूरी दिली होती. त्यानुसार एमडब्ल्यूची सुरक्षित चाचणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. चंडीगडच्या पीजीआयएमइआरचे संचालक डॉ. जगतराम म्हणाले, की एमडब्ल्यू व्हॅक्सिनची प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली.

मात्र त्याची प्रत्यक्षात त्याचा प्रयोग पीजीआय चंडीगड, एम्स दिल्ली आणि एम्स भोपाळ येथील चाळीस रुग्णावर केला जाणार आहे. यादरम्यान, एमडबल्यू लसची चाचणी पीजीआयमधील दाखल फुफ्फुसविकार असलेल्या रुग्णावर करण्यात आली आहे. या औषधाचा उपयोग टीबी, सेप्सिस यासारख्या आजारावर केला जात आहे. 

मात्र कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रथमच या औषधाचा वापर केला जाणार आहे. आतापर्यंतचे एमडब्ल्यूचे निष्कर्ष समाधानकारक आल्याने ही लस उपयुक्त ठरेल, असा दावा डॉ. जगतराम यांनी केला आहे. कोरोनाच्या उपचारासाठी निवडलेल्या या लसीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी दिल्ली, भोपाळ आणि पीजीआयच्या चाळीस रुग्णावर चाचणी घेतली जाणार आहे. 
एमडब्ल्यू लसची निर्मिती कॅडिला करते. रुग्णांवरील चाचणीसाठी लसीची मागणी नोंदवण्यात आली आहे. यानुसार चाचणीसाठी सरकारने पीजीआयसमवेतच दिल्ली आणि भोपाळ येथील एम्सची निवड केली आहे. डॉ. जगतराम म्हणाले, की देशभरात कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परंतु लससंदर्भात अपेक्षित परिणाम मिळताना दिसून येत नाही. अशा स्थितीत उपचारासाठी नवीन व्यवस्था विकसित करणे गरजेचे बनले आहे. एमडब्ल्यू लसीला कोरोनासाठी चाचणीच्या रुपातून वापरण्यासाठी सीएसआयआरची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. लससाठी संबंधित कंपनीची निवड करणे आणि प्रयोगासाठी आरोग्य संस्थांची निवड करणे यासाठी सीएसआयआरने मोलाचे काम केले आहे. 

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त 
एमडब्ल्यू लस ही इम्यूनो मॉड्यूलर श्रेणीत मोडते. याचा प्रयोग केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. कोरोनाबाधित रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही लस हातभार लावेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. एमडब्ल्यू लसच्या चाचणीसाठी व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची निवड केली जावू शकते. जेणेकरून लसचा परिणाम आणि प्रभाव याचे अचूक आकलन करणे शक्य होईल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live