वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांवर आरोप म्हणजे, 'साप-साप म्हणून भुई थोपटणे' - योगेश टिळेकर

अमोल कविटकर
सोमवार, 31 मे 2021

स्वतःला ओबीसी नेते म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांना ओबीसी आरक्षण वाचवण्यात अपयश आले असून हे अपयश लपवण्यासाठीच वडेट्टीवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करत असून आरोपाचा हा प्रकार म्हणजे साप-साप म्हणून भुई थोपटण्यासारखे आहे,' असा खरमरीत पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.

पुणे - स्वतःला ओबीसी OBC नेते म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांना ओबीसी आरक्षण वाचवण्यात अपयश आले असून हे अपयश लपवण्यासाठीच वडेट्टीवार Vijay Vadettiwar भाजप BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant patil यांच्यावर आरोप करत असून आरोपाचा हा प्रकार म्हणजे साप-साप म्हणून भुई थोपटण्यासारखे आहे,' असा खरमरीत पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर Yogesh Tillekar
यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. Vadettivars accusation against Chandrakant patil

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर ओबीसी नेत्यांवर धमकावण्याचा आरोप केला. त्यावर योगेश टिळेकर यांनी भूमिका मांडत, वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

हे देखील पहा -

टिळेकर बोलताना पुढे म्हणाले, वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ओबीसी नेत्याना धमकावण्याचा खोटा आरोप केला आहे. वास्तविक मंत्री वडेट्टीवार यांना ओबीसी समाजातून पाठिंबा मिळत नसल्याने त्यांनी प्रसिद्धीसाठी हे आरोप केले आहेत. जर धमकीच दिली आहे? तर मंत्री असलेल्या वडेट्टीवार यांना पोलिसात तक्रार द्यायला कोणी रोखले आहे? मुळात प्रसिद्धीच्या पलीकडे या आरोपात काहीही नाही'. Vadettivars accusation against Chandrakant patil

टार्झन स्टार जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू

'ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पडत होता. त्यावेळी आपण कुठे होता, हा प्रश्न राज्यातील ओबीसी समाज वडेट्टीवार यांना विचारत आहे. काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी वडेट्टीवार यांनी आंदोलनाच्या माध्यमातून नौटंकी केली. हे राज्याच्या ओबीसी समाजाने पाहिले आहे. त्यामुळे आता स्वतःचे अपयश लपवण्यासाठी, वडेट्टीवार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर खोटे आरोप करत आहात. मात्र आता वडेट्टीवार यांचा खोटारडेपणा, निष्काळजीपणा राज्यातील ओबीसी समाज ओळखून आहे. आरक्षणाच्या मुद्दावरुन जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकाराची बेताल वक्तव्य आपण करु नयेत', असेही टिळेकर म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live