क्रिकेट खेळताना युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मुंबई: क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूच्या छातीत दुखू लागले. मैदान सोडल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैभव केसरकर (वय 24) असे या खेळाडूचे नाव असून, त्याच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भांडूपमध्ये वैभव गावदेवी संघाकडून क्रिकेटचा सामना खेळत होता. या सामन्यात गावदेवी संघाने प्रथम फलंदाजी केली. वैभव जवळपास तीन षटकं फलंदाजी करत होता. यानंतर तो संघासह क्षेत्ररक्षणाला उतरला. मात्र, छातीत दुखू लागल्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. याची माहिती त्याने पंचांना दिली. यानंतर त्याने मैदान सोडले.

मुंबई: क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूच्या छातीत दुखू लागले. मैदान सोडल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैभव केसरकर (वय 24) असे या खेळाडूचे नाव असून, त्याच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भांडूपमध्ये वैभव गावदेवी संघाकडून क्रिकेटचा सामना खेळत होता. या सामन्यात गावदेवी संघाने प्रथम फलंदाजी केली. वैभव जवळपास तीन षटकं फलंदाजी करत होता. यानंतर तो संघासह क्षेत्ररक्षणाला उतरला. मात्र, छातीत दुखू लागल्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. याची माहिती त्याने पंचांना दिली. यानंतर त्याने मैदान सोडले. त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या भाऊसाहेब रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान वैभवचा मृत्यू झाला. वैभवच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. वैभवला सौम्य हृदयविकाराचा झटका येऊन गेला, असे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: vaibhav kesarkar died due heart attack while-playing cricket


संबंधित बातम्या

Saam TV Live