जम्बो कोविड सेंटरमधून मौल्यवान वस्तू चोरीला

गोपाल मोटघरे
बुधवार, 12 मे 2021

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अण्णा साहेब मगर स्टेडियम वरिल जम्बो कोविड सेंटर मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे जीव तर जाताच आहेत. मात्र आता कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे पैसे, सोन्या - चांदीचे दागिने आणि मोबाईल सारख्या मौल्यवान वस्तू देखील चोरी जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड Pimpri-Chinchwad महानगरपालिकेच्या अण्णा साहेब मगर स्टेडियम वरिल जम्बो कोविड सेंटर Jumbo Covid Center मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे जीव तर जाताच आहेत. मात्र आता कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे पैसे, सोन्या - चांदीचे दागिने आणि मोबाईल सारख्या मौल्यवान वस्तू देखील चोरी Stolen जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Valuables Stolen From Jumbo Covid Center

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अण्णा साहेब मगर स्टेडियम जम्बो कोविड सेंटर येथे अज्ञात चोरांकडून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या मौल्यवान साहित्याची चोरी होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचे पैसे, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल सारख्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 

हे देखील पहा -

जम्बो कोविड सेंटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असुनही चोरी होऊच कशी शकते हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता जम्बो सेंटर मधील चोरांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. Valuables Stolen From Jumbo Covid Center

जम्बो कोविड सेंटर मध्ये साहित्य चोरी गेलेल्या कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. कोरोना रुग्ण प्रशांत मोरे यांचा जम्बो कोविड सेंटर मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जम्बो सेंटर प्रशासनाने प्रशांत मोरे यांचे पार्थिव तर दिले  मात्र पैसे असलेलं पाकीट, मोबाईल आणि एटीएम कार्ड परत दिलेच नाही याबाबत प्रशांत मोरे यांची भाची वैष्णवी खुळे या तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आपल्या मामाच्या शेवटच्या आठवणींच्या वस्तू आपल्याला मिळाव्या म्हणून वैष्णवीने जम्बो कोविड सेंटर प्रशासनाकडे विचारपुस देखील केली.  तेव्हा त्यांच्या वस्तु चोरीला गेल्याचे तिला सांगण्यात आले. जम्बो सेंटरने उपचारा अभावी मामाचा जीव तर हिरावलाच आता त्यांच्या शेवटच्या आठवणी सुध्दा चोरांनी हिरावल्या असल्याची खंत वैष्णवीने व्यक्त केली. Valuables Stolen From Jumbo Covid Center

अशाच प्रकारची घटना सागर गुजर या तरुणा सोबत देखिल घडली आहे. सागरची आई शीतल गुजर यांचे जम्बो कोविड सेंटर मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले आहे. मात्र उपचारादरम्यान  सागरच्या आईचे सोन्या-चांदीचे दागिने देखिल चोरीला गेले आहेत. जम्बो सेंटरच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे माझ्या आईचा जीव तर गेलाच मात्र तिच्या शेवटच्या आठवणी असलेले सोन्या चांदीचे दागिने सुद्धा चोरी गेले असे मत सागरने व्यक्त केले. 

इस्रायलमध्ये रॉकेटच्या हल्ल्यात केरळमधील महिलेचा मृत्यू

वैष्णवी खुळे आणि सागर गुजर या दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारी वरून पिंपरी - चिंचवड पोलिसांनी पिंपरी पोलिस स्टेनश मध्ये दोन स्वतंत्र चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे जम्बो कोविड सेंटर मधिल चोर कोण हे शोधण्याच मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. Valuables Stolen From Jumbo Covid Center

जीवघेण्या कोरोना साथीच्या या कठीण काळात लोकांना योग्य उपचार मिळावा म्हणून पिंपरी - चिंचवड महापालिकेने खासगी कंत्राटदारांना कोविड सेंटर चालवायला दिले आहेत. मात्र महापालिकेच्या कोविड सेंटर मध्ये मृताच्या टाळू वरील लोणी खाण्याचं काम कोविड सेंटर प्रशासन करत आहे. 

Edited By : Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live