Video | स्पेस स्टेशनमध्ये फुलली मुळ्याची शेती, कोबी, मोहरीसह अंतराळात आता मुळ्याची शेती

साम टीव्ही
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

 

  • स्पेस स्टेशनमध्ये फुलली मुळ्याची शेती
  • संशोधकांची बाजी, अवकाशात कांदा, मुळा, भाजी
  • कोबी, मोहरीसह आता मुळ्याची शेती

आता बातमी एका अशा शेतीची. जी जमिनीवर केली गेलेली नाहीय. किंवा पृथ्वीवरही ही शेती फुललेली नाहीय. तर ही शेती करण्यात आलीय अवकाशात. 

ही हिरवीगार पानं असलेली मुळ्याची शेती कुठल्या गॅलरीत पिकवलेली नाहीय. किंवा कुठल्याही नर्सरीत ही मुळ्याची शेती केलेली नाहीय. ही मुळ्याची बाग जमिनीवर तर अजिबातच केलेली नाहीय. धक्का बसला ना? पण आम्ही खरं सांगतोय. ही शेती आहे स्पेस स्टेशनमधली. म्हणजेच अवकाश स्थानकातली.

अवकाशात कांदा, मुळा भाजी
अंतराळवीर केट रुबीन्स यांनी स्पेस स्टेशनमध्ये मुळ्याचं बियाणं लावलं होतं. त्याला कोंब फुटून 30 नोव्हेंबरला मुळ्यांची शेती यशस्वी झालीय. बियाणं लावून प्रत्यक्ष मुळ्यांची शेती यशस्वी होण्यास 27 दिवसांचा कालावधी लागलाय. त्याचप्रमाणे, अवकाशात पिकवलेले हे मुळे 2021 साली पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वी स्पेस स्टेशनमध्ये कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती आणि एका रशियन वनस्पतीची लागवड यशस्वी झाली आहे. अवकाशात मुळ्यासह पिकलेल्या या भाज्या म्हणजे अंतराळवीरांनी केलेलं क्रांतिकारी संशोधन म्हणावं लागेल. त्यामुळे, संशोधकांची बाजी आणि अवकाशात कांदा, मुळा, भाजी हे वाक्य त्यांनी खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवलंय. 

 

 

अमेरिका
 


संबंधित बातम्या

Saam TV Live