कोविड सेंटरमध्ये जेऊन दाखवा- 'वंचित'चे संदीप क्षीरसागरांना खुले आव्हान

विनोद जिरे
रविवार, 2 मे 2021

आमदार संदीप क्षीरसागरांनी कंत्राटदार कार्यकर्त्यांची पाठराखण करण्यासाठी ही स्टंटबाजी केलीय. कोविड सेंटरला दिलं जाणारं जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचं असून अतिशय कमी दिलं जातंय, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी केलाय.

बीड : येथील कोविड सेंटरला दिल्या जाणाऱ्या जेवणावरून, वंचित बहुजन आघाडीने (Vanchi Bahujan Aghadi) आक्रमक पवित्रा घेतलाय. कोविड सेंटरला दिल्या जाणाऱ्या जेवणाची तक्रार आल्यानंतर, आमदार संदीप क्षीरसागरांनी (Sandip Kshirsagar) बीडमधील (Beed) कोविड सेंटरमध्ये दिलं जाणारं जेवण केलं होतं. त्यानंतर त्यांनी जेवणाची प्रशंसा करत जेवण अधिक चांगलं देण्याच्या सूचना केल्या होत्या.आता या जेवणावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतलाय. Vanchit Aghadi Challenges Sandip Kshirsagar over Beed Covid Center food

आमदार संदीप क्षीरसागरांनी कंत्राटदार कार्यकर्त्यांची पाठराखण करण्यासाठी ही स्टंटबाजी केलीय. कोविड सेंटरला दिलं जाणारं जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचं असून अतिशय कमी दिलं जातंय, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी केलाय.

आमदार क्षीरसागरांना माझं खुल आव्हान आहे, जर तुम्हाला जेवण  करायचं असेल, तर माझ्यासोबत तुम्ही कोविड सेंटरला या आणि जे रुग्णाला जेवण दिलं जात ते करून दाखवा, असं खुल आव्हान प्रा.बांगर यांनी आमदार क्षीरसागरांना दिलं आहे. Vanchit Aghadi Challenges Sandip Kshirsagar over Beed Covid Center food

तुम्ही तिथं येणार म्हणून तुम्हाला सेपरेट डिश कार्यकर्त्यांनी बनवली होती. त्यामुळं या कार्यकर्त्यांचं टेंडर सांभाळण्यासाठी आमदार क्षीरसागर हजारो रुग्णांच्या आरोग्याशी खेळत आहेत.आज कोरोना रुग्णांना सकस आहार गरजेचा आहे. मात्र हा सकस आहार या बीड जिल्ह्यात दिला जात नाही, असे गंभीर आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी केले आहेत. दरम्यान तात्काळ जेवणात सुधारणा करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन करू, असा इशारा देखील बांगर यांनी दिलाय...!

Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live