'वंचित'चे कोव्हीड सेंटर; बाकीचे पक्ष कधी पुढाकार घेणार?

जयेश गावंडे
बुधवार, 28 एप्रिल 2021

अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात ५० बेडचे कोव्हीड सेंटर उभारले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने रुग्ण सेवेत आघाडी घेतली आहे. मात्र बाकीचे पक्ष कधी पुढे येणार आणि सध्या  गरज असलेल्या अशा प्रकारच्या कोव्हीड सेंटरची उभारणी कधी  करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 

कोला Akola जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे Vanchit Bahujan Aghadi सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात ५० बेडचे कोव्हीड सेंटर उभारले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने रुग्ण सेवेत आघाडी घेतली आहे. मात्र बाकीचे पक्ष कधी पुढे येणार आणि सध्या  गरज असलेल्या अशा प्रकारच्या कोव्हीड सेंटरची उभारणी कधी  करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. Vanchit Bahujan Aghadi Initiated Covid Centre in Akola

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण Politics असेल तरच राजकारणावरचा विश्वास आणि राजकारण्यांकडे आपला माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन अधिक दृढ होईल. कारण प्रत्येक राजकारण्यांची सुरुवातच समाजकारणातूनच झालेली असते. अन जो राजकारणी समाजकारण विसरत नाही तोच खरा राजकारणी होय आणि त्यामुळे च वंचित बहुजन आघाडी चे सर्वोसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

अकोला जिल्हा म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा Prakash Ambekdar गड मानला जातो. सध्या राज्यासह Maharashtra अकोल्यात ही कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज रुग्णसंख्याचे आकडे वाढतच चालले आहेत. दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत, ऑक्सिजन संपलेले आहे, वेंटीलेटर Ventilator चे बेड उपलब्ध नाहीत, रेमडिसिवीर Remdisivir इंजेक्शनचा तुटवडा आहे, सर्वोपचार रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ आहे. एक ना अनेक अडचणी सध्या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे  अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने अकोल्यात पन्नास खाटांचे एक सर्व सोयींनी युक्त कोव्हिड रुग्णालय अल्पावधीतच उभे करून आपल्यातील समाजकारणाचा परिचय दिला आहे.  Vanchit Bahujan Aghadi Initiated Covid Centre in Akola

सिविल लाइन्स चौकातील, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील विस्तीर्ण जागेत या सुसज्ज रुग्णालयाची निर्मिती केली गेली आणि लवकरच ते रुग्ण सेवेत रुजू सुद्धा होत आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ सुद्धा जिल्हा परिषदेच्या Akola Zilla Parishad माध्यमातून उपलब्ध केले गेले. अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची Vanchit Aghadi सत्ता आहे त्याचा उपयोग करीत आंबेडकरांनी हा उपक्रम सुरू केल्याने वंचितचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी आणि रुग्णांची सोय व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी  प्रमाणेच भाजपा BJP, काँग्रेस Congress किंवा राष्ट्रवादीने NCP सुद्धा एक एक सेंटर उभारायला हवे होते, असा सूर जनमानसातून उठतो आहे. अकोला जिल्ह्यात भाजपचे मजबूत  जाळे आहे. अकोला मनपा सह जिल्ह्यातील इतरही काही नगरपालिका व पंचायत समित्यात भाजपचे वर्चस्व आहे. ते तर प्रत्येक तालुक्यात कोव्हिड सेंटर उभारून राजकारणा सोबतच समाजकारण ही करू शकतात. Vanchit Bahujan Aghadi Initiated Covid Centre in Akola

हीच परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचीही आहे. त्यांच्याकडेही भरपूर जागा आहेत, सभागृह आहेत, त्यापैकी एखाद्या ठिकाणी कोविड सेंटरची निर्मिती केली जाऊ शकते. शहरात सध्या कोरोनाने अगदी वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. अशावेळी तरी राजकारण न करता किंवा एकमेकांवर चिखलफेक न करता काहीतरी विधायक करायची तयारी या पक्षांनी आता दाखवायला हरकत नाही.  वंचित ने अल्पावधीतच सगळी औपचारिकता पूर्ण करून कोव्हिड सेंटरची जशी निर्मिती केली तशाच प्रकारचे अजूनही दोन चार कोव्हिड सेंटर जिल्ह्यात असणे सध्या अतिशय गरजेचे आहे
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live