वसई विरार पालिकेने लपवले तब्बल २४३ करोना मृत्यू

Vasai Virar Corporation Hiding Corona Deaths
Vasai Virar Corporation Hiding Corona Deaths

वसई:  वसई विरार महापालिका करोनाग्रस्तांचे मृत्यू लपवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात मागील १३ दिवसात २०१ मृत्यू झाले असून पालिकेने  मात्र केवळ २३ मृत्यू दाखवले आहेत. चालू वर्षात जानेवारी ते १३ एप्रिल पर्यंत  २९५ मृत्यू झाले असताना पालिकेने केवळ ५२ दाखवले आहेत. म्हणजेच पालिकेने २४३ करोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू जनतेपासून लपवून ठेवले आहेत. Vasai Virar Municipal Corporation hide number of corona patients death

वसई विरार शहरात करोनाने हाहा_कार उडवलेला आहे. दररोज सरासरी ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. पालिकेतर्फे दररोज करोनाचा दैनंदिन अहवाल सादर केला जातो. त्यात शहरातील करोना मृत्यूचे आकडे केवळ १ आणि ० असेच असायचे. शहरात करोना ग्रस्तांचे मृत्यू होत असताना पालिका मृत्यूचा आकडा कमी दाखवत होती.  याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालू महिन्यात १ एप्रिल ते १३ एप्रिल पर्यंत शहरात तब्बल २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पण पालिकेने केवळ २३ मृत्यू दाखवले आहे. मंगळवार १३ एप्रिल रोजी शहरात एकाच दिवसात तब्बल ३६ रुग्णांचा मृत्यू झाला असताना पालिकेने दैनंदिन करोना अहवालात केवळ ३ मृत्यू दाखवले आहेत. 

चालू वर्षात जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ (१३ एप्रिल पर्यंत) शहरात एकूण २९५ रुग्ण दगावले आहेत. मात्र पालिकेने केवळ ५२ रुग्णांची नोंद दाखवली आहे. म्हणजेच पालिकेने मागील सव्वा तीन महिन्यातील २४३ करोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू लपवून ठेवले आहेत. Vasai Virar Municipal Corporation hide number of corona patients death

अशी झाली माहिती उघड 

सोमवार १२ एप्रिल रोजी शहरात करोनामुळे ११ मृत्यू झाले होते. त्यात एका खासगी रुग्णालयातील ७ रुग्णांचा समावेश होता. मात्र पालिकेने केवळ २ रुग्ण दगावल्याची नोंद दैंनदिन अहवालात केली होती. त्यामुळे पालिका करोना रुग्णांचे मृत्यू लपवत असल्यचा संशय येऊ लागला. शहरात मान्यता असलेली १० खासगी करोना रुग्णालये आहेत तर पालिकेची २ करोना केंद्रे आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पालिकेकडे सोपविण्यात येतो. सोबत करोना झाल्याचे प्रमाणपत्र असते. करोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहांची विल्हेवाट पालिकेच्या ८ स्मशानभूमींमध्ये करण्यात येते. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. किती मृतदेहांवर अंत्यसंसस्कार झाले त्यांची अधिकृत आकडेवारी पालिकेकडे आहे. ही यादी तपासली असता पालिकेने सव्वा तीन महिन्यात  
तब्बल  २४३ करोनाबाधीत रुग्णांचे मृत्यू लपविल्याचे उघड झाले आहे.

याबाबत पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेखा वाळके Surekha valke यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला शासनाकडून जे आकडे येतात तेेच मृतांचे आकडे देत होतो. असे सांगण्यात आले आहे. Vasai Virar Municipal Corporation hide number of corona patients death

मागील ३ महिन्याच्या मृतांच्या आकडेवारीत तफावत पाहता जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष मृत्यू २९ झालेले आहेत परंतु पालिकेकडे मात्र ९ जणांच्या मृत्यूंची नोंद आहे. या आकड्यामधील तफावत पाहता २० जणांच्या मृत्यूची नोंद केलेली गेलीच नाही. तसेच फेब्रुवारी महिन्यात हि १६ मृत्यू झाले परंतु ५ एवढीच संख्या दाखवण्यात आली. म्हणजे ११ मृत्यूची तफावत दाखविली.

पुढील महिन्यात म्हणजे मार्च मधेही ४९ लोक कोरोनामुळे मरण पावले परंतु मात्र १५ लोकांचीच नोंद केली गेली. या महिन्यातही मृतांचा (मार्च १३ पर्यंत)  आकडा हा २०१ च्या घरात होता. परंतु आकडेवारी २३ जणांचीच लिहिलेली होती . म्हणजेच एकूण १७८ लोक या मृत्यूच्या आकडेवारीत नव्हते. हि एकूण पूर्ण आकडेवारी पाहता धक्का बसेल अशीच आहे. यात एकूण प्रत्यक्ष मृत्यू २९५ झालेले आहेत पण पालिकेचे भेसळ आकडे एकूण ५२ मृत्यू दाखवतात. खरे पहिले तर या दोन संख्येत खरी तफावत तब्बल २४३ मृत रुग्णांची आहे. यावरूनच पालिकेत चाललेल्या कामाची प्रचिती येते. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com