पहिल्याच मुसळधार पावसात वसई विरार पालिकेची पोलखोल

चेतन इंगळे
शुक्रवार, 11 जून 2021

दरम्यान, राज्यात यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता.  

वसई विरार महानगर पालिकेने (Vasai-Virar City Municipal Corporation) या वर्षी नाले सफाई पूर्ण केल्याचा दावा केला होता. पण पहिल्याच मुसळधार पावसात पालिकेचा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. शुक्रवार सकाळ पासून विरारमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. काही वेळ उसंत घेत सातत्याने पाऊस पडत असल्याने शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. यातील पूर्व पश्चिम जोडणारा प्रमुख मार्ग विवा कॉलेज रोड सकाळ पासूनच पाण्याखाली गेला आहे. यामुळे नागरिकांना  मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात सकाळपासूनच गुडघाभर पाणी साचले आहे. याठिकाणी अनेक इमारतीच्या तळ मजल्यापर्यंत पाणी साचले आहे.यामुळे अनेक इमारतींची वीज सुद्धा बंद करण्यात आली आहे. (Vasai Virar under water in the first torrential rain)

हे देखील पाहा

दरम्यान, राज्यात यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता.  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईची तुंबाई झालेली पाहायला मिळाली. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाळा पूर्व कामं करण्यात आलेली होती. राज्यात मॅनहोलमुळे पडलेल्या महिलेमुळे वातावरण तापले होते. त्यामुळे महानगर पालिकेने कोणती कामे केली असे प्रश्न नागरिक विचारात आहेत. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live