सांगलीत नूतन वर्षात पाणी सामवण्यासाठी चांदोलीचा वसंत सागर जलाशय सज्ज... 

विजय पाटील
मंगळवार, 1 जून 2021

चांदोली धरणाच्या वर्षाचा 31 मे शेवटचा हा दिवस होता. तर 1 जून पासून धरणाचे नवीन वर्ष सुरू होत आहे. या नूतन वर्षात पाणी सामावून घेण्यासाठी वसंत सागर जलाशय सज्ज असून 34 .40 टी.एम. सी. क्षमता असणाऱ्या या  धरणात नववर्ष अखेरीस ही 42 टक्के पाणी साठा राहिला आहे. धरण व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले आहे

सांगली : चांदोली Chandoli मधील धरणाचा वर्षाचा 31 मे हा शेवटचा दिवस होता. तर 1 जून पासून धरणाचे नवीन वर्ष सुरू होत आहे. या नूतन वर्षात new year पाणी Water सामावून घेण्यासाठी वसंत सागर Vasant Sagar जलाशय सज्ज असून 34 .40 टी.एम. सी. क्षमता असणाऱ्या या  धरणात नववर्ष अखेरीस ही 42 टक्के पाणी साठा राहिला आहे. धरण व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. Vasant Sagar Reservoir ready to store water for Sangli in New Year 

सध्या चांदोली धरणात 14.45 टीएमसी TMC पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला हाच पाणीसाठा 11.83 टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत आजचा पाणीसाठा 2.62 टीएमसीने अधिक आहे. धरणातील 14.45 टीएमसी पाण्यापैकी 7 टीएमसी पाणी हे डेड स्टॉक असून उर्वरित 7.45 टीएमसी पाणी उपयुक्त आहे.

अभिनेता करण मेहराने अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

चांदोली परिसर हा पावसाचा rain आगार आहे. दरवर्षी 3 हजार ते 5 हजार मिलिमीटर येथे पाऊस पडतो. यंदाही येथे वेळेत पाऊस सुरू होईल. अशी, सध्या तरी चिन्हे वाटत आहेत. अवघ्या 8 ते  15 दिवसातच धरण 50 टक्के भरेल असे चित्र आहे.  दरवर्षी धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे मे च्या अखेरीस बंद होणारी वीज निर्मिती यंदा मात्र, पाणीसाठा समाधानकारक असल्यामुळे सुरूच असून 736 क्युसेक्स पाणी वीज निर्मिती केंद्रातून नदीपात्रात येत आहे. 2020 व 21 या तांत्रिक वर्षांमध्ये 2756 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली होती. 1 जून पासून नवीन 2021 व 22 हे वर्ष सुरू होत आहे. उद्यापासून पडणाऱ्या पावसाची नव्या वर्षात नोंद घेतली जाणार आहे. 

हे देखील पहा -

नव्या वर्षात 14.45 टीएमसी पाणीसाठा मुळातच शिल्लक असल्यामुळे धरण 100 टक्के भरण्यास 19.95 टीएमसी म्हणजेच केवळ 58 टक्के पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 602.50 मीटर आहे. यंदाप्रमाणेच नव्या वर्षातही पाण्याचे योग्य नियोजन करून पूर परिस्थिती निर्माण होणार नाही व भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. असे चांदोली धरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live