VIDEO| 'सोन्याचं बाशिंग, लगीन लागलं देवाचं....', विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही लगबग सुरुय देवाच्या लग्नाची.... वसंत पंचमीला भगवंताचा विवाह झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षी वसंत पंचमीच्या मुहुर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा केला जातो. भगवंताच्या लग्नासाठी मंदिराची खास सजावट करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल २ टन फुलांची आरास करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता मंदिरातील मुख्य सभा मंडपात शेकडो वऱ्हाडींच्या साक्षीनं साक्षात भगवंतांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी महिला भाविकांनी देवाच्या गाण्यावर ठेका धरला होता...

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना नवरा-नवरीप्रमाणे दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून नटवण्यात आलं होतं. या सोहळ्याच्या निमित्तानं मंदिरातील मूळ मूर्तींची विधिवत पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली. देव ब्राह्मणांच्या साक्षीनं सात मंगलाष्टका म्हणून तांदूळ आणि फुलांच्या वर्षावात हा आध्यात्मिक विवाह सोहळा संपन्न झाला. देवाचं लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी मंडळींसाठी खास मेजवानीही होती. साक्षात भगवंताचा विवाह सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवल्याचं समाधान भाविकांमध्ये दिसत होतं.  
 
webTittle ::  Vitaal-Rukmini's Royal Wedding Ceremony

संबंधित बातम्या

Saam TV Live